CM Kisan Yojana। नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना’ (CM Kisan Yojana) या योजनेची घोषणा करण्यात आली. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेनुसार एप्रिल नंतर शेतकऱ्यांना (CM Kisan Yojana) प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे एकूण सोळाशे कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे. यासाठी राज्यातील 79 लाख 27 हजार शेतकरी पात्र ठरले आहेत.
पीएम किसान योजना
2019 साली भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये इतकी मदत केली जाते. राज्य सरकारचे नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात याच योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते. त्यानुसार आता कार्यवाही सुरू झाली आहे. एप्रिल नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
‘अशी’ आहे योजना
अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही योजना जाहीर करण्यात आली. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना या योजनेच्या धर्तीवर ही योजना राबविण्यात येईल. यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. नवीन आर्थिक वर्षापासून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. यानंतर केंद्र सरकारचे 6 हजार आणि राज्य सरकारचे 6 हजार असे मिळून एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
वाचा: बाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?
काय आहेत अटी?
1 फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या योजनेसाठी ज्या अटी आहेत त्याच अटी मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी असणार आहेत. या अटी पुढीलप्रमाणे :
- क्षेत्राची कोणतीही मर्यादा नाही, पण जमीन लागवडी योग्य असावी.
- आधार बँक खात्याला लिंक केलेले असावे.
- ज्यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केवायसी केलेली आहे ते लाभार्थी पात्र ठरणार आहेत.
- महसूल विभागाला आपल्या सर्व मालमत्तेची माहिती दिलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कोणाला मिळणार नाही लाभ?
ज्यांची शेतजमीन 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची आहे पण ई केवायसी नसल्यामुळे व आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसल्यामुळे त्यांना तुर्तास या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्यांनी आपल्या नावावरील एकूण मालमत्तेची माहिती महसूल विभागाला दिलेली नाही त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. महाराष्ट्रात सुरुवातीला 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला होता. मात्र ई केवायसी नसल्यामुळे आणि आधार लिंक नसल्याने 36 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणे बंद झाले होते. या शेतकऱ्यांनाही मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: