अनुपम खेर हे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वीच अनुपम खेर यांचा शिव शास्त्री बालबोआ हा चित्रपट रिलीज झालाय. नुकताच अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमुळे अनुपम खेर हे चर्चेत आहेत.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी सर्वात अगोदर अनुपम खेर यांनीच सांगितली होती. त्यानंतर सतीश कौशिक यांच्या पार्थिवाकडे पाहून ढसाढसा रडतानाही अनुपम खेर हे दिसले होते. सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांची मैत्री अत्यंत जुनी आहे. सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनाच्या दोन दिवसांनी अत्यंत भावूक एक पोस्ट अनुपम खेर यांनी शेअर केली होती. या पोस्टसोबत त्यांनी एक व्हिडीओ तयार केला होता आणि या व्हिडीओमध्ये (Video) ते भावूक झाले होते. सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांची खास मैत्री होती. ते दोघे रोज सकाळी एकमेकांना फोन करत असत.
अनुपम खेर हे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वीच अनुपम खेर यांचा शिव शास्त्री बालबोआ हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटात अनुपम खेर हे एका पहलवानाच्या भूमिकेत होते. यासाठी त्यांनी आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देऊन बाॅडी तयार केली. अनुपम खेर यांनी म्हटले होते की, शिव शास्त्री बालबोआ चित्रपटाची स्टोरी ही एक साधारण व्यक्तीची असाधारण गोष्टीची आहे.
नुकताच अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. आता या पोस्टमुळे अनुपम खेर हे चर्चेत आले आहेत. या पोस्टसोबत अनुपम खेर यांनी व्हिडीओही शेअर केले आहेत. अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये अनुपम खेर हे भाषण देतानाही दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये एअर होस्टेस बोलताना दिसत आहे.
एअर होस्टेस म्हणते की, मी तुम्हा सर्वांना विनंती करते की तुम्ही तुमच्या सीटजवळ उभे रहा… सर्वांनी अनुपम खेर सरांसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करू… अनुपम खेर सर यांच्या मेहनतीबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन…पोस्ट शेअर करताना अनुपम खेर म्हणाले की, फ्लाइट क्रूचे आभार…फ्लाइट 6E979 मध्ये मला विशेष सन्मान देण्यात आला आणि माझ्या कामाचे काैतुक केले गेले.
काही दिवसांपूर्वी प्रकाश राज यांनी द कश्मीर फाईल्स या चित्रपटाला बकवास म्हटल्यानंतर अनुपम खेर यांनी चांगलाच क्लास घेतला. अनुपम खेर म्हणाले, लोक स्वतःच्या औकातबद्दल बोलतात… काही लोकांना आयुष्यभर खोटे बोलावे लागते…काही लोक आयुष्यभर सत्य बोलतात. मी अशा लोकांपैकी एक आहे…अनुपम खेर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगली व्हायरल झाली होती.