फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाइन डेनिमित्त आकांक्षाने तिचं रिलेशनशिप स्टेटस जाहीर केलं होतं. सहकलाकार समर सिंहसोबतचा फोटो पोस्ट करत तिने रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Akanksha Dubey
Image Credit source: Instagram
मुंबई : रविवारी वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी तिने टोकाचं पाऊल उचललं. आकांक्षाने तिचं आयुष्य का संपवलं असा प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे. कमी वयात तिने फिल्म इंडस्ट्रीत आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं. यादरम्यान आता एका अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ‘तुझी भीती खरी ठरली’ असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. यासोबतच आकांक्षाचा फोटो तिने पोस्ट केला आहे. काजल राघवानी असं त्या अभिनेत्रीचं नाव आहे. त्यामुळे काजलला आकांक्षाच्या आत्महत्येमागील कारण माहीत होतं का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.