‘एका सामान्य व्यक्तीप्रमाणे मी कारवाईचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र मला कोणतंही स्पष्ट उत्तर मिळालं नाही. मी माझ्या बहिणीसाठी न्यायाची मागणी करते’, अशी विनंती तिने या पोस्टद्वारे केली आहे.

Bhagyashree Mote with sister
Image Credit source: Instagram
मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीच्या संशयास्पद मृत्यूने पुणे हादरलं. भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेयचा मृतदेह पिंपरी-चिंचवडमधील वाकड इथं आढळला होता. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र कोणतीच ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल आता भाग्यश्रीने केला आहे. भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर याविषयी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने बहिणीच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचप्रमाणे न्यायाची मागणी केली आहे. मधू मार्कंडेयच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा आढळल्या होत्या. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. मधू ही भाग्यश्रीची मोठी बहीण होती.