भोजपुरी सिनेमातील आघाडीची अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तिच्या चाहत्यांना तर हा मोठा धक्का आहे. तिची अत्यंत जवळची मैत्रीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंह हिला सुद्धा मोठा धक्का बसला आहे.

Akanksha Dubey
Image Credit source: tv9 marathi
मुंबई : प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबेने आत्महत्या केली आहे. वाराणासीच्या सारनाथ परिसरातील एका हॉटेलमध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. पण आकांक्षाने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वच कलाकार हादरून गेले आहेत. आकांक्षाला वैयक्तिक आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागत होता यावर भोजपुरी कलाकारांना विश्वासच बसेनासा झाला आहे. आकांक्षाच्या मृत्यूमुळे भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहलाही धक्का बसला आहे. या बातमीमुळे ती पुरती हादरून गेली असून काय काय बोलावं आणि काय नाही? या प्रश्नाने तिला चिंताग्रस्त केलं आहे.