पठाण चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खान याने खरेदी केली तब्बल इतक्या कोटींची आलिशान कार, किंमत ऐकून चाहत्यांना मोठा धक्का – After the success of the film Pathaan Shah Rukh Khan bought a luxury car worth so many crores

मनोरंजन


पठाण चित्रपटानंतर शाहरुख खान हा चर्चेत आलाय. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याने डंकी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. काही दिवसांपूर्वी जवान चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाले होते.

पठाण चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खान याने खरेदी केली तब्बल इतक्या कोटींची आलिशान कार, किंमत ऐकून चाहत्यांना मोठा धक्का

Image Credit source: Twitter

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत लकी ठरल्याचे दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी केलीये. विशेष म्हणजे फक्त पठाण हाच चित्रपट (Movie) नाहीतर यंदा शाहरुख खान याचे अजून दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या यशानंतर आपल्या आगामी जवान चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केलीये. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याने डंकी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. काही दिवसांपूर्वी जवान चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो (Photo) व्हायरल झाले होते.

2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. झिरो हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. यामुळे शाहरुख खान हा परत कधी बाॅलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार की, नाही हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता.

अत्यंत धमाकेदार पध्दतीने शाहरुख खान याने चार वर्षांनी पठाण चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने ओपनिंग डेलाच जगभरातून तब्बल 100 कोटींचे कलेक्शन केले. या चित्रपटाने जवळपास 1000 कोटींचे कलेक्शन हे बाॅक्स आॅफिसवर केले आहे.

शाहरुख खान याच्याबद्दल एक अत्यंत मोठी चर्चा सुरू आहे. इतकेच नाहीतर याबद्दलचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पठाण चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खान याने एक आलिशान कार खरेदी केलीये. विशेष म्हणजे या कारची किंमत ऐकून तुमचे डोळे नक्कीच विस्फारतील.

शाहरुख खान याच्या या आलिशान कारणची किंमत तब्बल 10 कोटी असल्याचे सांगितले जातंय. ही कार सध्या देशात विकली जाणारी सर्वात महागडी SUV कार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. शोरूममध्ये या कारची किंमत 8.20 कोटी आहे. पण इतर सर्व खर्च पकडून ही कार 10 कोटीपर्यंत जाते. शाहरुख खान याने खरेदी केलेल्या हा कारचे नाव रोल्स-रॉयस आहे.

शाहरुख खानच्या या आलिशान कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये नंबर प्लेटवर 555 आहे. ही कार मन्नतच्या आत जाताना देखील दिसली. पठाण चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खान याने ही कार खरेदी केली असल्याची चर्चा आहे. आता शाहरुख खान याच्या या कारचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *