Matrutva Vandana Yojana | केंद्र सरकारची मोठी घोषणा! आता महिलांना ‘या’ योजनेंतर्गत मिळणार 6 हजार, चार टप्प्यात होणार खात्यावर जमा

कृषी


Matrutva Vandana Yojana | केंद्र सरकारच्या माध्यमातून सामान्य नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्याचे काम केले जाते. तसेच केंद्र सरकार महिलांच्या (Matrutva Vandana Yojana) सन्मानासाठी आणि त्यांना सोयी सुविधा प्राप्त व्हाव्या यासाठी देखील बऱ्याच योजना राबवण्यात येत आहेत. याचपैकी एक गर्भवती महिलांसाठी राबवण्यात येणार पीएम मातृत्व वंदना योजना (Matrutva Vandana Yojana) होय. या योजनेंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते.

कोणाला मिळणार लाभ?
देशात मातृत्व वंदना योजना ही गर्भवती महिलांसाठी राबवण्यात येते. तर मातृत्व वंदना योजनेतंर्गत विवाहित गर्भवती महिलांना 6 हजार रुपये मिळतात. महिलांची प्रकृती व्यवस्थित रहावी मूल कुपोषित जन्माला येऊ नये असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. एकंदरीत या योजनेचा फायदा आई आणि बाळाला देखील होतो.

कसे मिळतात 6 हजार?
गर्भवती महिलांना या योजनेचे 6 हजार टप्प्याटप्प्याने दिले जातात. महिलांना पहिल्या टप्प्यात 1 हजार रुपये दिले जातात. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 हजार रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात देखील महिलांना 2 हजार रुपये दिले जातात. यानंतर जेव्हा महिलेची प्रसूती होते त्यानंतर एक हजार रुपये दिले जातात. बाळाच्या जन्मानंतर मिळणारे हे 1 हजार रुपये आई आणि बाळासाठी उपयुक्त ठरतात.

कसा मिळेल योजनेचा लाभ?

  • गर्भवती महिलेचे वय किमान 19 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • या योजनेत तुम्हाला फक्त ऑफलाइन अर्ज करावा लागणार आहे.
  • सरकारकडून महिलांच्या खात्यात 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये ट्रान्सफर करण्यात येतात.
  • ही योजना 1 जानेवारी 2017 रोजी सुरू झाली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Central government’s big announcement! Now women will get 6,000 under this scheme, deposited in the account in four stages


आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *