सलमान खान याच्यासाठी राखी सावंत उतरली मैदानात, थेट लॉरेन्स बिश्नोई याच्याबद्दल केले हे मोठे वक्तव्य – Rakhi Sawant was seen supporting Salman Khan

मनोरंजन


राखी सावंत ही गेल्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत होती. बिग बाॅस मराठीमधून बाहेर पडल्यावर राखी सावंत हिने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. सात महिन्यांपूर्वीच राखी सावंत हिने आदिल दुर्रानी यांच्यासोबत लग्न केले होते.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत ही प्रचंड चर्चेत आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) हिने तिचा पती आदिल दुर्रानी याच्यावर काही गंभीर आरोप केले. हे प्रकरण इतके जास्त वाढले की, आदिल दुर्रानी याच्या विरोधात राखी सावंत हिने थेट पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. आदिल दुर्रानी याला पोलिसांनी चाैकशीसाठी बोलून अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केली आणि आता सध्या आदिल दुर्रानी हा जेलमध्ये आहे. बिग बाॅस (Bigg Boss) मराठीमधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत हिने थेट सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला.

राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारला आहे. इतकेच नाहीतर राखी सावंत हिने आपले नाव लग्नानंतर फातिमा आदिल दुर्रानी असल्याचे सांगितले. काही दिवस राखी सावंत हिचा संसार सुखी होता. मात्र, मोठा खुलासा करत राखी सावंत म्हणाली की, मला आदिल दुर्रानी हा धोका देत आहे.

आदिल दुर्रानी याच्यासोबतच्या वादानंतर राखी सावंत दररोजच चर्चेत आहे. सर्वांनाच माहिती आहे की, राखी सावंत ही सलमान खान याला आपला भाऊ मानते. इतकेच नाहीतर सलमान खान याने यापूर्वी वाईट काळात राखी सावंत हिची मदत देखील केलीय. राखी सावंत हिची आई दवाखान्यात असताना सलमान खान याने तिच्या आईच्या उपचारासाठी मदत केली होती.

काही दिवसांपूर्वीच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी थेट जेलमधून दिली. लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. इतकेच नाहीतर लॉरेन्स बिश्नोई याच्या धमकीनंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये. मुंबई पोलिसांनी सलमान खान याच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवलीये.

आता लॉरेन्स बिश्नोई आणि बिश्नोई समाजाला अत्यंत मोठी विनंती करताना आणि माफी मागताना राखी सावंत ही दिसली आहे. राखी सावंत म्हणाली की, सलमान खान हा माझा भाऊ आहे आणि तो खूप चांगला व्यक्ती आहे. त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मात्र, त्यावर बाॅलिवूडमधील कोणाचीही बोलण्याची हिंमत झाली नाहीये.

सलमान खान हा माझा भाऊ असल्यामुळे मी यावर बोलणार आहे. सलमान खान याला धमक्या देणाऱ्याचे डोळे फुटून जावो…त्यांची स्मरणशक्ती कमी होऊन जावो…मी लॉरेन्स बिश्नोई याला विनंती करते आणि संपूर्ण बिश्नोई समाजाची माफी मागते…पण त्यांनी माझ्या सलमान खान भाईला काहीच करू नये…यावेळी हात जोडताना देखील राखी सावंत ही दिसत आहे. आता राखी सावंत हिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *