अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीे त्याची आधीची पत्नी आणि भावाविरोधात 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. या दोघांवरही त्याने 21 कोटी रुपये हडपल्याचा आरोपही केला आहे.

nawazuddin siddiqui
Image Credit source: tv9 marathi
मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने अखेर कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहे. आपल्याच सख्ख्या भावाविरोधात आणि आधीच्या पत्नीविरोधात नवाजुद्दीन कोर्टात गेला आहे. भाऊ शम्सुद्दीन आणि आधीची पत्नी अंजना पांडेय यांच्याविरोधात नवाजने 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. या दोघांनीही आपली बदनामी केली असल्याचा आरोप त्याने केला आहे. तसेच दोघांकडून आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचंही त्याने म्हटलं आहे.