वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं स्वतःचं जीवन; निधनाच्या काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने चाहत्यांसोबत…

वाराणसी : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये स्वतःला संपवलं आहे. अभिनेत्रीने वयाच्या २५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सारनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री आकांक्षाने आपला जीव घेतला. आकांक्षा दुबे टिक टॉक स्टार म्हणून स्वतःच्या करीअरची सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. पण तिने अचानक टोकाचा निर्णय घेतल्यामुळे चाहते आणि सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या २५ वर्षी आकांक्षाला भोजपुरी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली. अभिनेत्रीने पवन सिंह याच्यासोबत देखील काम केलं.