‘या’ अभिनेत्रीवर एक दोन नाही तर, तब्बल ७०० खटले दाखल, म्हणते, ‘मला एकटीला सर्वकाही…’ – Kangana Ranaut struggle story bollywood 700 cases filed on her

मनोरंजन


वादग्रस्त भूमिकांमुळे अडचणीत सापडणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर देशातील वेग-वेगळ्या शहरांमध्ये ७०० खटले दाखल; ‘ती’ आज एकटी करतेय संघर्ष…

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या कायम त्यांच्या वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत असतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे कंगना रनौत (Kangana Ranaut). कंगनाला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. कंगनाच्या चाहत्यांची संख्या जेवढी आहे, त्यापेक्षा अधिक अभिनेत्रीच्या विरोधकांची संख्या असल्याचं दिसून येतं. कंगना कायम वादाचा मुकूट स्वतःच्या डोक्यावर घेवून मिरवत असते. एखाद्या वादग्रस्त प्रकरणावर स्वतःची भूमिका मांडल्यामुळे कंगनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा खुद्द कंगनाने तिच्यावर ७०० खटले दाखल असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली. शिवाय ज्या अभिनेत्यांसोबत काम करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो, त्यांच्या सोबत स्क्रिन शेअर करण्यास अभिनेत्रीने नकार दिला.

एकदा कंगना म्हणाली, तिच्यावर देशातील वेग-वेगळ्या शहरांमध्ये ७०० खटले दाखल करण्यात आले आहे. ‘ही परिस्थिती मला एकटीला सांभाळावी लागणार आहे. शिवाय आगामी सिनेमांची कामे देखील मलाच पहायची आहेत. पण या सर्व गोष्टी एकटीने सांभाळण्याची ताकद माझ्यात नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.

kangna

हे सुद्धा वाचा



एवढंच नाही, बॉलिवूडमध्ये नवीन असताना कंगनाने शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्यासोबत सिनेमात काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता. फक्त एकाच अटीवर खान अभिनेत्यांसोबत काम करण्यास कंगनाने होकार दिला होता. जर सिनेमात माझी भूमिका खान अभिनेत्यांच्या बरोबरीची असेल तरच मी त्यांच्यासोबत एकत्र स्क्रिन शेअर करण्यास तयार होईल. असं कंगना म्हणाली..

जेव्हा कंगनाला एका ब्रेकची गजर होती तेव्हा कोणताही अभिनेता तिच्यासोबत काम करण्यास तयार नव्हता. पण यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्यानंतर मात्र कंगनासोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी अनेक अभिनेते तयार आहेत. कंगनाने आतापर्यंत एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्रीचे काही सिनेमे चाहत्यांच्या पसंतीस उतरले, तर काही सिनेमांमात्र अपयशाचा सामना करावा लागला.

kangna ranavat

कंगना आता दुसऱ्या बॅनरखाली तयार होणाऱ्या सिनेमांमध्ये काम करत नसून, अभिनेत्रीचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस आहे. आता कंगना फक्त एक अभिनेत्रीनसून निर्माती आणि दिर्गर्शक देखील आहे. २०२३ मध्ये कंगना रनौत दिग्दर्शित ‘इमरजेन्सी’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका बजावताना दिसणार आहे.

आज कंगना मोठ्या पडद्यावर आणि सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर कंगनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *