परिणीती सोबत लग्न करणार का? यावर खासदार राघव चड्ढा म्हणाले… – raghav chadha breaks silence on relationship with parineeti chopra

मनोरंजन


परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या नात्याबद्दल मोठी अपडेट समोर; दोघांमध्ये असलेल्या नात्याचं सत्य समोर आल्यानंतर राघव चड्ढा यांची मोठी प्रतिक्रिया

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा (parineeti chopra) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. परिणीती एका खासदाराला डेट करत असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून परिणीती खासदार राघव चड्ढा यांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे फोटो समोर आल्यानंतर दोघांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. पण रंगणाऱ्या चर्चांवर अद्याप परिणीती चोप्रा हिने कोणत्याही प्रकारची भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे दोघे खरंच डेट करत आहेत का? असा प्रश्न चाहत्यांच्या आणि अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. परिणीती हिच्यासोबत असलेल्या नात्याची चर्चा राघव चड्ढा यांनी अखेर मौन सोडलं आहे. परिणीती हिच्या सोबत असलेल्या नात्या संबंधी प्रश्न विचारल्यानंतर खासदार राघव चड्ढा पुन्हा चर्चेत आले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संसदेतून बाहेर आल्यानंतर राघव त्यांच्या कारच्या दिशेने जात होते. तेव्हा पत्रकारांनी त्यांनी अभिनेत्रीसोबतच्या नात्याबद्दल विचारले. परिणीती चोप्रासोबतच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंनंतर राघव यांना प्रश्न विचारण्यात आला. राघव यांना परिणीतीसोबत लग्न करणार का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला.  तेव्हा चड्ढा हसत म्हणाले, ‘ तुम्ही मला राजकारणाबद्दल प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल विचारू नका.’

हे सुद्धा वाचाराघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्यांची ओळख महाविद्यालयापासून आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर देखील राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी त्यांच्या नात्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण दोघे फक्त चांगले मित्र असल्याची माहिती समोर येत आहे.

राघव चड्ढा हे आम आदमी पक्षाचे पंजाबचे खासदार आहेत. मुंबईतील एका रेस्टोरेंटबाहेर परिणीतीसोबत स्पॉट झाल्यानंतर राघव चड्ढा चर्चेत आले आहेत. पण दोघांमध्ये मैत्रीचं नातं असल्याची माहिती समोर येत आहे. राघव यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर परिणीतीची प्रतिक्रिया काय असेल… याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे…

परिणीती सोशल मीडियावर देखील फार सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

परिणीता हिने अनेक सिनेमांमध्ये भूमिका बजावत चाहत्यांच्या मनात घर केलं. परिणीताने २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लेडीज vs रिक्की’ सिनेमातून करियरला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. चाहते कायम परिणीताच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *