वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं जीवन; पोलिसांची चौकशी सुरु असताना अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने असं काय कले, ज्यामुळे सर्वत्र खळबळ
वाराणसी : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं (akanksha dubey) वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये स्वतःला संपवलं आहे. अभिनेत्रीने वयाच्या २५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सारनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री आकांक्षाने आपला जीव घेतला. आकांक्षा दुबे हिच्यासोबत नक्की असं काय झालं ज्यामुळे अभिनेत्रीने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीच्या निधनाचं नक्की कारण काय’? हे चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. आकांक्षा दुबेच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचा तपास सुरु असताना अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड समर सिंह याचा फोन बंद आहे. शिवाय समर सिंह याच्यासोबत कोणताही संपर्क होवू शकत नाही. याप्रकरणानंतर अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पण पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.
आकांक्षा दुबे हिने वयाच्या २५ व्या वर्षी स्वतःला संपवल्यामुळे सिनेविश्वाला धक्का बसला आहे. गेल्या महिन्यात १४ फ्रेब्रुवारी रोजी आकांक्षा दुबे हिने बॉयफ्रेंड समर सिंह याच्यासोबत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तेव्हाच अभिनेत्रीने बॉयफ्रेंड समर सिंह याच्यासोबत असलेल्या नात्याची सर्वांसमोर कबुली दिली होती. आता रिपोर्टनुसार, निधनानंतर अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड समर सिंह फरार आहे.
आकांक्षा दुबे लवकरच नायक सिनेमाचं शुटिंग सुरू करणार होती, असं सांगण्यात येत आहे. रविवारी सकाळी ९ वाजता मेकअप बॉय अभिनेत्रीला बोलावण्यासाठी हॉटेलमध्ये गेला होता. पण तेव्हा उशीर झालेला होता. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्रीच्या निधनानंतर पोलीस तपासात आता काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आज सकाळी म्युझिक टोन नावाच्या यूट्यूब चॅनलवर आकांक्षा दुबेचं शेवटचं गाणं ‘ये आरा कभी हरा नही’ प्रदर्शित झालं आहे. अभिनेत्री शेवटच्या गाण्यात आकांक्षा दुबे पवन सिंगसोबत दिसली होती. आकांक्षा दुबे भोजपुरी चित्रपटसृष्टीत यशाची शिडी चढत होती. अशात अभिनेत्रीचं निधन झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
मेरी जंग मेरा फैसला सिनेमातून आकांक्षाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘मुझसे शादी करोगी’ (भोजपुरी), वीरों के वीर, फायटर किंग, कसम पैदा करने की 2 यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आकांक्षाच्या आत्महत्येनं भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.