जवळपास महिन्याभरापूर्वी आकांक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. सहकलाकार समर सिंगसोबतचे फोटो तिने पोस्ट केले होते.

Akanksha Dubey
Image Credit source: Instagram
वाराणसी : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. ती 25 वर्षांची होती. सारनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री आकांक्षाने आपला जीव घेतला. त्याठिकाणी ती तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी गेली होती. आकांक्षा ही मूळची भदोही जनपदच्या चौरी ठाणा क्षेत्रातील परसीपूर इथली राहणारी होती. भोजपुरी इंडस्ट्रीतील ती प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने आत्महत्या का केली, यामागचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. आकांक्षाच्या आत्महत्येनं भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.