माधवन आमिरला पाठिंबा देत म्हणतो, “आमिरने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.” माधवनच्या या वक्तव्यावर रोहित आमिरची खिल्ली उडवत पुढे म्हणतो, “दोन वर्षांत एक हिट देऊन कोणी हिटमॅन बनत नाही.”

Aamir Khan and Rohit Sharma
Image Credit source: Twitter
मुंबई : ‘थ्री इडियट्स’ हा बॉलिवूडमधल्या अशा काही निवडक चित्रपटांपैकी एक आहे, ज्याने चाहत्यांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं. नुकत्याच एका व्हिडीओमध्ये आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांना पुन्हा एकत्र पाहून चाहते फार उत्सुक झाले होते. हे तिघे मिळून थ्री इडियट्सचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र हे तिघे चित्रपटासाठी नाही तर एका क्रिकेट ॲपला प्रमोट करण्यासाठी एकत्र आले होते.