उर्वशी आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र नंतर सोशल मीडियावर दोघांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांना टोमणे मारले. उर्वशीने एका मुलाखतीत आरपीचा (RP) उल्लेख केला होता. तो आरपी ऋषभ पंतच असावा, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता.

Urvashi Rautela and Rishabh Pant
Image Credit source: Twitter
मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या कामापेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. उर्वशीचं नाव क्रिकेटर ऋषभ पंतशी जोडलं गेलंय, ही बाब जगजाहीर आहे. या दोघांमधील लव्ह-हेट रिलेशनशिपच्या चर्चांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. उर्वशीने तिच्या सोशल मीडियावर काहीही पोस्ट केलं तरी नेटकरी त्याची लिंक ऋषभ पंतशी जोडण्याचा प्रयत्न करतात. इतकंच नव्हे तर कार्यक्रमांमध्येही उर्वशीसमोर चाहते ऋषभच्या नावाचा जयघोष करत असतात. असे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र त्यावर उर्वशीने नेहमीच प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला ऋषभविषयी प्रश्न विचारला गेला. त्यावर अखेर अभिनेत्रीचा पारा चढला.