आमिर खानचा मुलगा जुनैद याच्यासोबत रोमान्स करताना दिसणार श्रीदेवी यांची लेक खुशी? – Sridevis daughter Khushi Kapoor and Aamir Khan son Junaid khan romance

मनोरंजन


आमिर खानचा मुलगा आणि श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार? नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या…

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्स यांच्या पदार्पणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, जान्हवी कपूर, सारा अली खान यांच्यानंतर आता अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान देखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली असताना, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर आणि अभिनेता आमिर खान याचा मुलगा जुनैद खान एकत्र स्क्रिन शेअर करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहे. जुनैद खान आणि खुशी कपूर देखील त्यांच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोघांनी यशराजसोबत सिनेमाची शुटींग केली आहे. त्यांचा सिनेमा लवकरच प्रदर्शित देखील होणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, जुनैद खान आणि खुशी कपूर यांनी नवीन प्रोजेक्ट देखील मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुनैद खान आणि खुशी कपूर ‘लव्ह टूडे’ सिनेमाच्या हिंदी रिमेकच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. तामिळ ‘लव्ह टूडे’ सिनेमात अभिनेता प्रदीप रंगनाथन आणि अभिनेत्री इवाना यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

रिपोर्टनुसार, ‘लव्ह टूडे’ सिनेमाच्या हिंदी रिमेकची जबाबदारी फॅन्टम स्टोडिओजवर असल्याची चर्चा रंगत आहे. पण याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सध्या सर्वत्र जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमात जुनैद खान आणि खुशी कपूर रोमान्स करताना दिसणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.

हे सुद्धा वाचा



खुशी कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक खुशी दिग्दर्शक झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘द आर्चीज’ सिनेमा खुशी कपूर हिच्यासोबतच महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदा आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील झळकणार आहे.

खुशी अद्याप अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील खुशीच्या चाहत्यांचा आकडा फार मोठा आहे. खुशी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *