परिणीतीने 2011 मध्ये ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं. त्यानंतर ती ‘इशकजादे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली.

Raghav Chadha and Parineeti Chopra
Image Credit source: Instagram
मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यात नेमकं काय शिजतंय, याची चर्चा संपूर्ण देशभरात होत आहे. हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत का, ते एकमेकांचे जुने मित्र आहेत का, ते लग्न करणार आहेत का असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहेत. यावर अद्याप दोघांनी थेट कोणतं उत्तर दिलेलं नाही. मात्र आता परिणीती आणि राघव यांच्या नात्याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. परिणीती आणि राघव यांना जेव्हा एकत्र डिनरला गेल्याचं पहायला मिळालं, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर पुन्हा गुरुवारी या दोघांना एकत्र लंच डेटला पाहिलं गेलं.