अगोदर इन्स्टा लाईव्ह करत ढसाढसा रडली, नंतर डिलिट, अभिनेत्रीसोबत काय घडलंय? धक्कादायक व्हिडीओ व्हायरल – Akanksha Dubey’s Insta Live video before her death has gone viral

मनोरंजन


कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आकांक्षा दुबे सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ आणि काही रिल्स शेअर करायची. अगदी कमी कालावधीमध्ये आकांक्षा दुबे हिने आपली स्वत: ची एक खास ओळख निर्माण नक्कीच केलीये. तिच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

मुंबई : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. वाराणसीतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आकांक्षा दुबे हिने आपली जीवनयात्रा संपवली आहे. शूटिंग संपल्यानंतर आकांक्षा दुबे हॉटेलमध्ये गेली आणि त्यानंतर तिने आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलले. आकांक्षा दुबे हिची फॅन फाॅलोइंग (Fan following) देखील जबरदस्त आहे. कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आकांक्षा दुबे सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ (Video) आणि काही रिल्स शेअर करायची. विशेष म्हणजे चाहते देखील आकांक्षा दुबे हिच्या फोटोंना आणि व्हिडीओला प्रचंड प्रेम द्यायचे.

आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी आता तपासाला सुरूवात केलीये. आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येनंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. आकांक्षा हिने आत्महत्येसारखे पाऊल नेमके का उचलले हा प्रश्न सतत उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे आत्महत्येच्या पूर्वी आकांक्षा दुबे ही इन्स्टाग्रामवर लाईव्ह आल्याचे सांगितले जातंय.

इन्स्टाग्रामवर लाईव्हमध्ये आकांक्षा दुबे ही ढसाढसा रडताना दिसत आहे. मात्र, हा लाईव्हचा व्हिडीओ अगदी काही सेकंदांचा आहे. आता व्हिडीओ पाहून हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, रात्री नेमके असे काय घडले होते की, आकांक्षा दुबे ही रडताना दिसली आणि अचानक तो व्हिडीओ बंद झाला आणि तिने थेट आत्महत्या केली.

आकांक्षा दुबे हिचा मृतदेह सारनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील सोमेंद्र हॉटेलमध्ये आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. आकांक्षा 25 वर्षांची होती आणि तिने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीमध्ये खास ओळख मिळवली होती. आकांक्षा दुबे हिने आत्महत्या नेमकी का केली हे अजूनही कळू शकले नाहीये.

आकांक्षा दुबे हिने आपल्या करिअरची सुरुवात टिकटॉक या सोशल प्लॅटफॉर्मवरून केल्याचे सांगितले जात आहे. टिकटॉकमुळेच तिची फॅन फाॅलोइंग वाढल्याचे सांगितले जाते. टिकटॉकनंतर तिने भोजपुरी चित्रपटांमध्ये अभिनय करण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे अगदी कमी कालावधीमध्ये आकांक्षा दुबे हिने आपली ओळख निर्माण केली.

आकांक्षा दुबे हिने इंस्टाग्राम अकाउंटवर एक शायरी देखील शेअर केली होती. मात्र, अचानक आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येची बातमी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. आत्महत्येच्या अगोदर आकांक्षा दुबे नेमकी कोणत्या कारणामुळे इन्स्टाग्रामवर लाईव्ह आली होती आणि ती त्यावेळी का रडत होती हाच प्रश्न अनेकांनी पडल्याचे दिसत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *