Sonali Bendre हिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटर; पर्समध्ये फोटो ठेवायचा आणि… – once in time former pakistani cricketer shoaib akhtar fall in love with sonali bendre

मनोरंजन


९० च्या दशकातील अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी होती, एक पाकिस्तानी क्रिकेटर देखील अभिनेत्रीच्या होता प्रेमात, सोनालीला मिळवण्यासाठी त्याने…

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्हस्टोरी आहेत, ज्या कायम चर्चेत असतात. ९० च्या दशकातील कलाकार आज त्यांच्या खासगी आयुष्यात प्रचंड आनंदी आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र त्यांच्या नात्याची चर्चा रंगलेली असायची. अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य केलं. आज सोनाली मेठ्या पडद्यापासून दूर असली सोशल मीडियावर आणि तिच्या अनेक गोष्टीमुळे चर्चेत असते. सोनाली हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण सर्वसामान्य जनताच नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील सोनालीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. महत्त्वाचं म्हणजे एक पाकिस्तानी क्रिकेटर देखील अभिनेत्रीच्या प्रेमात होता. हा पाकिस्तानी क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून शोएब अख्तर होता.

एक काळ असा होता, जेव्हा शोएब अख्तर अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. सोनालीच्या प्रेमात असलेल्या शोएब अख्तरच्या एका वक्तव्याने सर्वत्र खळबळ माजली होती. सोनालीचं अपहरण करण्याच्या विचारात होतो.. असं शोएब अख्तर एका मुलाखतीत म्हणाला होती.

रिपोर्टनुसार, शोएब अख्तरला सोनाली प्रचंड आवडत होती. अभिनेत्रीबद्दल एका मुलाखतीत शोएब अख्तर म्हणाला. सोनाली प्रपोज करण्यासाठी काहीही करेल आणि जर तिने माझं प्रेम मान्य केलं नाही तर, मी तिचं अपहरण करेल.. असं शोएब अख्तर एका टॉक शोमध्ये म्हणाला होता. एवढंच नाही तर, सोनालीचा फोटो क्रिकेटर पर्समध्ये ठेवत असल्याचं देखील अनेकदा समोर आलं.

हे सुद्धा वाचा



पण काही वर्षांनंतर शोएब अख्तर म्हणाला की, ‘मी कधीही सोनालीचा चाहता नव्हतो. मी जवळपास दोन वेळा तिचे सिनेमे पाहिले असतील. मी तिला कधीही भेटलो नाही. मी तिला फक्त सिनेमांमध्ये पाहिलं आहे. ती एक सुंदर महिला आहे… कर्करोगाला झुंज देत असताना मी तिचा संघर्ष पाहिला आहे. तिने मोठा संघर्ष करुन गंभीर आजाराला हरवलं आहे…’

क्रिकेटर पुढे म्हणाला, ‘तिचा संघर्ष पाहिल्यानंतर मी तिचा चाहता झालो. इतकी धाडसी आणि हुशार स्त्री पाहून मला खूप आनंद झाला. तिने इतर महिलांना मार्ग दाखवला. माझा तिच्यासोबत कधीच संबंध नव्हते.’ असं देखील शोएब अख्तर म्हणाला.

सोनाली गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. २०१८ साली अभिनेत्री कर्करोग ग्रस्त असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी दिली. तेव्हा अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर अभिनेत्री उपचारासाठी अमेरिकेत गेली होती. पण आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर आहे. कर्करोगावर मात केल्यानंतर अभिनेत्री अनेक रिऍलिटी शोमध्ये देखील दिसली. सोनाली सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *