PM Awas Yojana | स्वतःचं पक्कं घर असावं असं प्रत्येकाचच स्वप्न असतं. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (PM Awas Yojana) ही योजना ग्रामीण भागातील जनतेला हक्काचं आणि पक्कं घर मिळावं यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र या योजनेचा 2022-23 सालासाठीचा निधी मंजूर झालेला नव्हता. त्यामुळे या योजनेचे लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत होते. त्यांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे. कारण शासनाकडून या योजनेसाठी (PM Awas Yojana) निधी मंजूर करण्यात आला आहे. चल तर मग जाणून घेऊयात किती निधी मंजूर करण्यात आला आहे.
किती निधी केला मंजूर?
2022-23 सालासाठी केंद्र व राज्य सरकारने मिळून तब्बल 1396 कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचं स्वतःचं पक्कं घर बांधण्याचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यांवर लवकरच हप्ते जमा करण्यात येतील. या योजनेअंतर्गत अनेक जणांचं घरकुल मंजूर झालेलं होतं. मात्र निधी काही मिळाला नव्हता. सरकारने काढलेल्या नवीन जीआरमुळे या निधीचं लाभार्थ्यांना लवकरच वितरण होईल.
कोणाला मिळतो लाभ?
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही योजना विविध प्रवर्गांसाठी राबवण्यात येते. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग, ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचा समावेश होतो. या विविध वर्गांसाठी 2022-23 या सालासाठी निधीची तरतूद केंद्र व राज्य सरकार या दोहोंनी मिळून केली आहे. यामुळे घरकुल मंजूर झालेल्यांना लवकरच निधी मिळणार आहे.
वाचा: बाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?
कसे केले जाणार निधीचे वितरण?
यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी एकूण 816.99 कोटी रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. यापैकी 490 कोटी रुपये इतका वाटा केंद्राचा तर 320 कोटी रुपये इतका वाटा राज्याचा आहे. अनुसूचित जमातीसाठी (SC) एकूण 204.19 कोटी रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. यापैकी 122.8 कोटी रुपये इतका केंद्र सरकारने तर 81.39 कोटी रुपये इतका वाटा राज्य सरकारने उचलला आहे.
केंद्राचा आणि राज्याचा वाटा
अनुसूचित जमातीसाठी एकूण 376.51 कोटी रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. यापैकी 225.91 कोटी रुपये इतका वाटा केंद्राचा तर 150.60 कोटी रुपये इतका वाटा राज्य सरकारचा आहे. या निधीचे वितरण झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचं घर बांधण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि त्यांना आपल्या स्वतःच्या पक्क्या घरात राहता येईल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
Web Title: Now your dream home will come true! Approval to disburse funds of crores for PM Awas Yojana