Government Decision | आजच्या काळात जमिनीचा तुकडा म्हटलं तरी प्रचंड महत्त्वाचा आहे. कारण जमिनीला सध्या करोडो रुपयांचा भाव आहे. आज जमिनीचे कितीतरी ठिकाणी प्लॉटिंग पडत आहेत. त्यामुळे जमिनीचे तुकडे करून गुंठेवारीमध्ये ही जमीन विकली जात आहे. परंतु गुंठेवारी जमीन विकताना किंवा त्याची नोंदणी करताना सातत्याने गुंतागुंती होते. जमीन धारकांना किंवा गुंठेवारीने जमीन खरेदी करणाऱ्या नागरिकांना सतत याचा त्रास होत असतो. म्हणूनच आता राज्य शासनाच्या (Government Decision) माध्यमातून याबाबत मोठं पाऊल उचलण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे (Government Decision) आता गुंठेवारी नोंदणी बाबतचा गुंता सुटणार आहे.
नोंदणी अधिनियम
नोंदणी अधिनियम 1908 व महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 चे नियमामधील तरतुदीनुसार दस्तांची नोंदणी केली जाते. महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 चे नियम 44 मध्ये दस्त नोंदणी करण्यापूर्वी दुय्यम निबंधकांनी कोणत्या बाबी तपासाव्यात याची सूची देण्यात आली आहे. नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 21 व 22 मध्ये दस्तातील मिळकतीचे वर्णन संदिग्धता निर्माण होणार नाही. अशा प्रकारे ओळखता येईल इतपत पुरेसे असणे आवश्यक असल्याबाबत नमूद आहे.
महत्त्वपूर्ण शासन निर्णय
नोंदणी अधिनियमाचे कलम 21 व 22 आणि महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 चे नियम 44 तसेच नोंदणी महानिरीक्षक कार्यालयामार्फत परिपत्रक निर्गमित झाले आहे. तर दि. 12 जुलै 2021 नुसार दस्त नोंदणी करताना सदर कलम, नियम व परिपत्रक यांचे पालन करून दस्त नोंदणी करण्यात आले आहे. दुय्यम निबंधकांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
वाचा: बाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?
तसेच नोंदणी अधिनियमाचे कलम 21 व 22 चे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने व त्यामधील तरतुदी अधिक परिणामकारक करण्यासाठी त्यात सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सर्वंकष अभ्यास करण्यात आला आहे. यासाठी शासनास शिफारशी करण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
Web Title: Big decision of the state government! A big step taken in Gunthewari, the tangle of registration will be solved in one fell swoop