Amitabh Bachchan Health : अपघातानंतर कशी आहे बिग बींची प्रकृती? मोठी अपडेट समोर – Amitabh Bachchan Health update after big b resumes for shooting

मनोरंजन


वयाच्या ८० व्या वर्षी ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात झाला आहे. बिग बींच्या अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांचा हैदराबाद याठिकाणी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना अपघात झाला. वयाच्या ८० व्या वर्षी ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात झाला.बिग बींच्या अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत आहेत. अपघातानंतर बिग बी यांच्या बरगड्यांना दुखापत झाल्याची माहिची समोर आली. अपघातानंतर बिग बी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. अपघाताला अनेक दिवस होवून देखील बिग बी यांची प्रकृती पूर्णपणे ठिक झालेली नाही. पण तरी देखील अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे. सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची चर्चा रंगत आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून प्रकृतीची माहिती दिली आहे. ब्लॉगमध्ये बिग बी म्हणतात, ‘जखमी असताना देखील… पूर्ण बरं होण्याची इच्छा आणि प्रयत्न करायला हवेत. तुमची चिंता, काळजी आणि मिळालेल्या प्रेमाचा आभारी आहे… तुमच्यामुळेच सर्व प्रयत्न सुरु आहेत.’

पुढे बिग बी म्हणाले, ‘कामाचं वेळापत्रक तयार झालं आहे आणि चार्ट आता नव्याने भरायला सुरुवात केली आहे. कारण कामाशिवाय दुसरा कोणताही टाईमपास होवू शकत नाही. बरगड्या आणि पायाच्या बोटांमध्ये अद्याप वेदना आहेत. होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी समाधान शोधायला हवा…’ असं देखील बिग बी म्हणाले. आता बिग बींची प्रकृती सुधारत आहे. शिवाय त्यांनी शुटिंगला देखील सुरुवात केली आहे.

हे सुद्धा वाचाबिग बीच्या अपघातानंतर ‘प्रोजेक्ट K’सिनेमावर मोठं संकट आलं आहे. सिनेमात बिग बींसोबत अभिनेता प्रभास, दीपिका पादुकोण, दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘प्रोजेक्ट K’ सिनेमाची शुटिंग २०२१ मध्ये सुरु झाली. पण कोरोना असल्यामुळे सिनेमाचं शुटिंग पूर्ण होवू शकलं नाही. आता बिग बी जखमी झाल्यामुळे सिनेमाचं शुटिंग थांबलं आहे.

‘प्रोजेक्ट K’ सिनेमा ५०० रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा भारतातील सर्वांत जास्त बजेट असलेला सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *