अजित आणि त्यांचे दोन बंधु अनुप कुमार आणि अनिल कुमार यांनी मिळून सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. त्याचसोबत अशा कठीण काळात आमच्या खासगी आयुष्याचा सन्मान करा, अशी विनंती त्यांनी चाहत्यांना आणि माध्यमांना केली आहे.

Ajith Kumar
Image Credit source: Instagram
चेन्नई : तमिळ सुपरस्टार अजितकुमारचे वडील पी. सुब्रमण्यम यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. अजितकुमारच्या वडिलांचं निधन वृद्धापकाळाच्या समस्यांमुळे झाल्याची माहिती समोर येत आहे. चेन्नईमधील बेसेंट नागा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. अजितकुमारने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. या पोस्टवर कमेंट करत सर्वसामान्यांसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली. ‘अजितकुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या सहवेदना व्यक्त करते. पी. सुब्रमण्यम यांच्या आत्म्याला शांती लाभो’, असं अभिनेत्री साक्षी अग्रवालने लिहिलंय. तर असंख्य चाहत्यांनीही कमेंट करत शोक व्यक्त केला.