Agriculture Loan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! प्रति शेतकरी खात्यात जमा होणार तब्बल एक लाख रुपये; जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?

कृषी


Agriculture Loan | नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नियमित कर्जाची (Agriculture Loan) फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्यात पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेती पिकांवर 3 लाख रुपयांचे कर्ज (Agriculture Loan) घेणाऱ्या व त्या कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता त्यावरील व्याज देण्यात येणार आहे. याच संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना
केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्याज सवलत योजना राबवली जाते. राज्यात पंजाबराव देशमुख व्याज योजनेंतर्गत 1 लाख रुपयांचे कर्ज माफ केले जाते. त्यामुळे याचबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय घेण्यात आला आहे. नियमितपणे पीक कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणारं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा
केंद्र शासनाच्या माध्यमातून 3 टक्के व्याज आणि राज्य शासनाच्या माध्यमातून 3 टक्के व्याज अशा प्रकारे 1 ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज माफ केले जाते. हा लाभ नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळतो. नियमित पीक कर्जाची परतफेड करून शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते.

वाचाबाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

किती निधीला दिली मान्यता?
शेतकऱ्यांना या पीक कर्जाच्या व्याजाची रक्कम देण्यासाठी उपयुक्त असलेला 118.32 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. असा शासन निर्णय 24 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पीकावर कर्ज घेतल्यास त्या कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास शेतकऱ्यांना हे व्याज खात्यात जमा होते. आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! As much as one lakh rupees will be deposited in each farmer’s account; Find out if you can get it

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *