Agricultural Consultancy | पुढचे पाच दिवस शेतकऱ्यांच्या पिकासाठी धोक्याचे! जाणून घ्या हवामान आधारित पिक निहाय कृषी सल्ला

कृषी


Agricultural Consultancy | हवामान विभागाच्या अंदाजानुसार,
पुढील पाच दिवस दिनांक 25 ते 29 मार्च 2023 दरम्यान आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची अधिक
शक्यता आहे. दिनांक 26 मार्च 2023 रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा
पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. 27 मार्च रोजी तुरळक ठिकाणी हलक्या
स्वरूपाचा आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह (Agricultural Consultancy) पाऊस होण्याची शक्यता आहे. 25, 28 व 29 मार्च रोजी हवामान कोरडे राहण्याची
अधिक शक्यता आहे. म्हणूनच शेतकरी मित्रांनो हवामान आधारित पीक निहाय कृषी सल्ला (Agricultural Consultancy) जाणून घ्या.

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

काय आहे पीक निहाय कृषी सल्ला?
वादळी वाऱ्याचा अंदाज लक्षात घेता, अत्यावश्यक फवारणीची कामे हि स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना
करावी. पावसाचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील (हरभरा, गहू, मोहरी, जवस इत्यादी.)
पिकाची काढणी व मळनीची कामे तत्काळ उरकून घ्यावी. कापणी व मळणी च्या कामास पुरेसे मनुष्यबळ
उपलब्ध नसल्यास कम्बाईन हार्वेस्टरद्वारे काढणीची कामे करून घेण्यास प्राधान्य द्यावे.

शेतमाल कसा ठेवाल?
कापणी झाली असल्यास
व पिक शेतामध्ये पसरले असल्यास शेतामध्ये उंचवटा असलेल्या ठिकाणी जमा करून ताडपत्री किंवा प्लास्टिक
शीटच्या सहाय्याने शेतमाल झाकून ठेवावा. कापणी व मळणी केलेला शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही
याची काळजी घ्यावी. मेघगर्जनेसह विजांची शक्यता लक्षात घेता शेतामध्ये काम करत असताना दोन व्यक्तींमध्ये
जास्तीत जास्त अंतर ठेवावे.

वाचाबाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

जनावरांची कशी घ्याल काळजी?
मेघगर्जनेची चाहूल लागताच तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. झाडांखाली
आसरा घेणे कटाक्षाने टाळावे. शेळ्या, गाय, म्हैस व इतर पाळीव जनावरांना झाडाखाली न बांधता त्यांना सुरक्षित
ठिकाणी बांधावे. जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे तसेच गोठया मधेच चारा व पाण्याची
उपलब्धता करून घ्यावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The next five days are dangerous for farmers’ crops! Know Climate Based Crop Wise Agriculture Advice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *