संताप आणणारा प्रकार उघडकीस, ऑस्कर जिंकल्यानंतर गुनीत मोंगा थेट रुग्णालयात दाखल, धक्कादायक प्रकार उघडकीस – Guneet Monga was hospitalized after winning the Oscar award 2023

मनोरंजन


आरआरआर चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार जिंकून मोठा इतिहास रचला आहे. आरआरआर चित्रपटातील गाण्याला थेट ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले होते.

मुंबई : नाटू नाटू या गाण्याने इतिहास रचला आहे. आरआरआर (RRR) चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. आरआरआर चित्रपटातील गाण्याला थेट ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले होते. इतकेच नाहीतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आरआरआर चित्रपटाच्या टिमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे फक्त ऑस्कर पुरस्कारच (Oscar award 2023)  नाहीतर त्यापूर्वी नाटू नाटू गाण्याने प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कारही जिंकला होता.

नुकताच ऑस्कर जिंकल्यानंतर आरआरआर चित्रपटाचे संगीतकार एमएम किरावानी यांनी एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा केला आहे. एमएम किरावानी यांना मुलाखतीमध्ये ऑस्कर 2023 मध्ये गुनीत मोंगाच्या भाषणाच्या कट ऑफ वादावर विचारण्यात आले. यावर एमएम किरावानी यांनी मोठा खुलासा केला.

यावर बोलताना एमएम किरावानी म्हणाले की, ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर गुनीत मोंगा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांना बोलण्यासाठी वेळ देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांचा अचानकच श्वास कोंडायला लागला आणि त्यांना थेट तब्येत बिघडल्यामुळे रूग्णालयाच दाखल करण्यात आले.

आता एमएम किरावानी यांनी केलेला हा मोठा खुलासा ऐकून चाहत्यांना धक्का बसलाय. ऑस्कर 2023 मध्ये गुनीत मोंगाच्या स्पीड कट ऑफचे प्रकरण चांगलेच गाजले होते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी यावर खुलासा केला होता. मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या होत्या की, ऑस्कर जिंकल्यानंतर मला बोलण्याची पूर्ण संधी दिली गेली नव्हती, माझा माइक बंद करण्यात आला.

आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला. बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आरआरआर टिमचे काैतुक केले होते. करण जोहर याने पोस्ट शेअर करत म्हणले होते की, आरआरआर चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर मी बेडवर उड्या मारल्या…

ऑस्कर पुरस्काराच्या वितरणावेळी आरआरआर चित्रपटाला थेट बाॅलिवूड चित्रपट असे म्हटले गेले होते. यावरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. यावर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली होती. आरआरआर हा चित्रपट बाॅलिवूडचा चित्रपट नसल्याचे १०० वेळा लिहून ठेवा असेही युजर्स म्हणताना दिसत होते. आरआरआर हा एक साऊथ आणि भारतीय चित्रपट असल्याचे अनेकांनी म्हणत व्हिडीओवर कमेंट केल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *