‘माझ्यासाठी प्रार्थना करा…’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री गंभीर आजाराने त्रस्त – yeh rishta kya kehlata hai fame lataa saberwal gets diagnosed with throat nodules

मनोरंजन


वेळेत उपचार झाले नाहीत तर, अभिनेत्रीची होईल अशी अवस्था… सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने दिली गंभीर आजाराबद्दल माहिती… सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा…

मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (yeh rishta kya kehlata hai) मालिका चाहत्यांचं आजही मनोरंजन करत आहे. २००९ मध्ये छोट्या पडद्यावर प्रदर्शित झालेली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमुळे अनेक कलाकारांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. मालिकेत अक्षरा ही भूमिका साकारत अभिनेत्री हिना खान हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. शिवाय तिचा बॉलिवूडच्या मार्ग देखील मोकळा झाला. मालिकेत हिनाच्या आईची भूमिका अभिनेत्री लता सबरवाल (lataa saberwal) यांनी साकारली होती. मालिकेत लता सबरवाल यांनी राजश्री या भूमिकेत झळकत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मालिकेतूनच लता सबरवाल यांना नवी ओळख मिळाली. शिवाय लता सबरवाल यांच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं.

पण गेल्या काही दिवसांपासून लता सबरवाल मालिकेपासून दूर आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी मालिकाचा निरोप घेतल असल्याची घोषणा केली. त्यानंतर त्या फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होत्या. पण आता त्यांच्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. लता सबरवाल एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत.

लता सबरवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या आजाराचा खुलासा केला आहे. लता सबरवाल यांना घशाचा गंभीर आजार झाला आहे. जर झालेल्या आजारावर वेळेत आणि योग्य उपचार झाले नाहीत, तर आवाजही गमावण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या लता सबरवाल त्यांच्या आजारामुळे चर्चत आहे.

हे सुद्धा वाचा



लता सबरवाल यांनी पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. लता सबरवाल पोस्ट शेअर करत म्हणाल्या, ‘नुकताच मी घशाच्या आजारासाठी ENT तज्ज्ञांची भेट घेतली. माझ्या घशात गाठ आली आहे. प्रकृती स्थिर होण्यासाठी जवळपास १ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.’

लता सबरवाल पुढे म्हणाल्या, ‘प्रकृती सुधारण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी सतत औषधं घेत आहे. योग्य काळजी घेतली नाही तर माझा आवाजही जाऊ शकतो..’ असं म्हणत लता सबरवाल यांनी ‘कृपया… माझ्यासाठी प्रार्थना करा…’ असं म्हणत चाहत्यांकडे विनंती केली आहे.

लता सबरवाल यांनी पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी कमेंट करत लता सबरवाल यांनी प्रकृतीची काळजी घ्या असं सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *