झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेतून अजिंक्य घराघरात पोहोचला. यामध्ये त्याने अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबत मुख्य भूमिका साकारली होती. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली.

Sari
Image Credit source: Instagram
मुंबई : प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित प्रेमकथा ‘सरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या पोस्टरवर ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अजिंक्य राऊत, विविध चित्रपटांतून तरुणांच्या हृदयाचा ठाव घेणारी अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पृथ्वी अंबर यांच्या प्रेमाचा त्रिकोण पहायला मिळत आहे. आता त्यांचं हे प्रेम त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइज अँड मिरॅकल्स’ अशी या प्रेमकथेची टॅगलाईन आहे.