धनुष एका मुलीच्या आईच्या प्रेमात, दुसरं लग्न करण्यासाठी पत्नीसोबत मोडला १८ वर्षांच्या संसार? – south cinema actor dhanush going to get married second time

मनोरंजनरजनीकांत यांच्या लेकीसह घटस्फोट घेतल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेता धनुष दुसऱ्या लग्नाच्या तयारीत; एका मुलीच्या आईसोबत पुन्हा अडकणार विवाहबंधनात?

मुंबई : झगमगत्या विश्वात कायम ब्रेकअप, घटस्फोट, भांडणं… अशा अनेक चर्चा रंगलेल्या असतात. या प्रकरणांची चर्चा चाहत्यांमध्ये देखील तुफान रंगलेली असते. पण आता चर्चा रंगत आहे दिग्गज अभिनेते रजनीकांत यांचा जावई आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुष याच्याबद्दल. धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांचा घटस्फोट झालं आहे. १८ वर्ष सुखी संसार केल्यानंतर दोघांनी गेल्या वर्षी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता घटस्फोट झाल्यानंतर धनुष दुसऱ्यांदा विवाबबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगत आहे. म्हणून अभिनेता नक्की कोणासोबत लग्न करणार याबद्दल चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, दुसरं लग्न करण्यासाठी धनुष याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला का? यांसारख्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

धनुषच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा रंगत असताना अभिनेता नक्की कोणासोबत विवाबबंधनात अडकणार अशी चर्चा रंगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनुष मल्याळम अभिनेत्री मीनाबरोबर लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दुसऱ्या लग्नाबद्दल धनुष कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अभिनेता बलवाने याने धनुषच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत बलवाने याने लग्नाबद्दल सांगितलं असल्याची माहिती मिळत आहे. सध्या धनुष लग्नाची तयारी करत असल्याचा खुलासा बलवान याने केला आहे. सध्या सर्वत्र धनुष आणि मल्याळम अभिनेत्री मीना यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे मीनाचं देखील दुसरं लग्न आहे. शिवाय अभिनेत्रीला एक मुलगी देखील आहे.

मीनासोबत धनुष याचं देखील दुसरं लग्न असणार आहे. धनुष आणि पहिली पत्नी ऐश्वर्या यांना दोन मुलं आहे. घटस्फोटानंतर देखील अनेक ठिकाणी धनुष आणि ऐश्वर्या मुलांसाठी एकत्र आले. दोघांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. मध्यंतरी धनुष आणि ऐश्वर्या मुलांसाठी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला. पण आता धनुषच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत.

धनुष आणि ऐश्वर्या यांची पहिली भेट

धनुष आणि ऐश्वर्या यांची यांची पहिली भेट सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान झाली होती. सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी ऐश्वर्या वडील रजनीकांत यांच्यासह आली होती. तेव्हा धनुषचा परफॉर्मन्स ऐश्वर्याला प्रचंड आवडला आणि ती धनुषच्या प्रेमात पडली. अखेर दोघांच्या पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं.

प्रथम ऐश्वर्याने मैत्रीसाठी पुढाकार घेतला. त्यानंतर दोघांमधील नातं अधिक घट्ट झालं. अखेर दोघांनी कुटुंबाच्या सहमतीने २००४ रोजी मोठ्या धाटात लग्न केलं. १८ वर्ष सुखी संसार केल्यानंतर अखेर दोघांनी गेल्या वर्षी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *