उर्फी जावेद हिने चक्क टॉयलेट पेपरचा ड्रेस तयार करून झाकले अंग, नेटकरी म्हणाले, रमजानचा पवित्र महिना… – Uorfi Javed got trolled on social media for wearing a dress made from toilet paper

मनोरंजन


उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद (Uorfi Javed) ही प्रचंड चर्चेत आहे. उर्फी जावेद ही तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रा वाघ यांनी तर थेट पोलिस स्टेशन गाठत उर्फी जावेद हिच्या विरोधात तक्रार दिली. उर्फी जावेदच्या कपड्यांच्या स्टाईल विरोधात चित्रा वाघ मैदानामध्ये उतरल्या. मात्र. यादरम्यानच उर्फी जावेद हिने देखील चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना सडेतोड उत्तर दिले. उर्फी जावेद हिला भेटेल तिथे चोपून काढण्याची भाषा चित्रा वाघ यांनी केली होती. मात्र, याचा काहीच परिणाम उर्फी जावेद हिच्यावर झाल्याचे दिसले नाही.

नुकताच उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिची बहीण देखील दिसत आहे. यावेळी उर्फी जावेद हिने चक्क टॉयलेटच्या पेपरपासून तयार केलेला ड्रेस घातला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिची बहीण म्हणताना दिसत आहे की, कालच टॉयलेट पेपर आणले होते कुठे गेले?

उर्फी आली होती ? इतक्यामध्ये उर्फी जावेद पुढे येते आणि तिने चक्क टॉयलेटच्या पेपरपासून तयार केलेला ड्रेस घातला आहे. आता उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या स्टाईलनंतर उर्फी जावेद हिचे काैतुक केले तर काहींनी नेहमीप्रमाणे उर्फी जावेद हिच्यावर टिका केलीये.

ट्रोल करत एकाने लिहिले की, कमीतकमी रमजानमध्ये तरी फालतू काम सोडा…. मरण्याची थोडी भीती बाळगा…दुसऱ्याने लिहिले की, हिच्या अंगावर थोडे पाणी टाका. तिसऱ्याने लिहिले की, अजून काही शिल्लक आहे का? अरे हिला कोणीतरी थांबवा रमजानचा पवित्र महिना सुरू आहे आणि हिचे काही नेमके काय सुरू आहे.

सोशल मीडियावर उर्फी जावेद ट्रोल होणे ही काय पहिली वेळ नसून यापूर्वीही अनेकदा उर्फी ट्रोल झालीये. बिग बाॅस ओटीटीमधून उर्फीला खरी ओळख मिळालीये. बिग बाॅस ओटीटीच्या अगोदर अनेक टिव्ही मालिकांमध्येही उर्फी जावेद हिने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने शर्ट न घालता एक फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये तिच्या हातामध्ये नाश्त्याची प्लेट दिसत होती.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *