असित मोदी यांनी चाहत्यांना दिले मोठे गिफ्ट, तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्ये आता… – Asit Kumarr Modi gave a big gift to his fans, a film to be made on the series Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

मनोरंजन


तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये मुंबईतील एक सोसायटी दाखवण्यात आली असून या सोसायटीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक किती जास्त आनंदाने राहतात हे दाखविले गेले आहे.

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे जबरदस्त असे मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या कलाकारांची मोठी फॅन फाॅलोइगं देखील आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेमधील कलाकार सतत मालिका (Series) सोडून जाताना दिसत आहेत. या मालिकेला अनेक कलाकारांनी कायमचा अलविदा दिलाय. मात्र, अजूनही मालिका टीआरपीमध्ये (TRP) टाॅपलाच आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड असे प्रेम मिळताना दिसते. विशेष म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही मालिका प्रचंड आवडते.

मालिकेचे निर्माता असितकुमार मोदी हे सतत मालिकेमध्ये काही बदल करताना दिसतात. या मालिकेमध्ये मुंबईतील एक सोसायटी दाखवण्यात आली असून या सोसायटीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक किती जास्त आनंदाने राहतात हे दाखविले गेले आहे. या मालिकेतील टप्पू सेना ही लहान मुलांचा आवडता विषय आहे. अनेक उपक्रम सोसायटीमध्ये टप्पू सेना करते. टप्पू हे या टप्पू सेनेचा लिडर आहे.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असितकुमार मोदी यांनी अत्यंत महत्वाची माहिती शेअर केलीये. असितकुमार मोदी यांना तारक मेहता शोवर चित्रपट तयार करणार का? हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना असितकुमार मोदी म्हणाले की, हो नक्कीच लवकरच तारक मेहता मालिकेवर एक चित्रपट तयार करणार आहे. हा एक अॅनिमेटेड चित्रपटही असेल.

असितकुमार मोदी यांनी केलेल्या या मोठ्या घोषणेनंतर आता चाहते तारक मेहता का उल्टा चश्मा या चित्रपटाची वाट पाहात आहेत. दयाबेन म्हणजे दिशा वकानी हिने देखील मालिकेमधून मोठा ब्रेक घेतला आहे. दयाबेन हे मालिकेमधील मुख्य पात्र आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दयाबेन मालिकेमध्ये दिसत नाहीये. जेठालाल आणि दयाबेनची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

चाहते दयाबेनला मालिकेमध्ये पाहण्यास आतुर आहेत. प्रेक्षक दयाबेनच्या पुनरागमनाची वाट पाहात आहेत. टप्पू के पापा हे वाक्य दयाबेनची ऐकायला चाहत्यांचे तरसले आहेत. चाहते सतत दयाबेन कधी मालिकेमध्ये कधी परतणार हे विचारताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी तारक मेहता अर्थात शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वी मालिकेला सोडचिठ्ठी दिली. असित मोदी आणि शैलेश लोढा यांच्यामध्ये काहीतरी बिनसले असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वीच रंगल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *