अर्जुन आणि मलायका यांना अनेकदा ट्रोल करण्यात आलं. आता ‘या’ ठिकाणी एकत्र आल्यामुळे दोघेही ट्रोल… व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी कमेंट करत म्हणाले…
मुंबई : अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अरोरा (malaika arora) आणि अर्जुन कपूर (arjun kapoor) यांच्या नात्याच्या चर्चा रंगू लागल्या. महत्त्वाचं म्हणजे अर्जुन आणि मलायका यांनी त्यांच्या नात्याची कबुली सर्वांसमोर दिली. एवढंच नाही अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मलायका – अर्जुन त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात शिवाय अनेक ठिकाणी दोघे एकत्र पोहोचतात. नुकताच मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. याच कर्यक्रमात अर्जुन आणि मलायका यांनी एकत्र प्रवेश केला. दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी दोघांना ट्रोल देखील केलं आहे.
अर्जुन आणि मलायका यांच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी म्हणाले, ‘सच में मुन्नी बदनाम हो गई…’ मलायका आणि अर्जुन यांना एकत्र पाहिल्यानंकर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘आई – मुलाची जोडी दिसत आहे…दोघांचं प्रेम पाहून डोळ्यात पाणी आलं…’ , अर्जुन आणि मलायका यांच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोल केलं आहे.
याआधी देखील अर्जुन आणि मलायका यांना अनेकदा ट्रोल करण्यात आलं. अर्जुन आणि मलायका यांच्या वयातील अंतरामुळे देखील दोघांना ट्रोल करण्यात आलं. पण अर्जुन आणि मलायका कोणत्याही गोष्टीला अधिक महत्त्व न देता फक्त आणि फक्त त्यांच्या भावनांना महत्त्व दिलं. आता दोघे अनेकांना कपल गोल्स देतात.
गेल्या अनेक वर्षांपासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत आहे. त्यामुळे दोघांना लग्न बंधनात कधी अडकणार याबद्दल कायम विचारलं जातं. लग्नावर देखील मलायकाने प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रत्येक गोष्टीचा शेवटी लग्नावर येवून का थांबतो… लग्न एक अशी गोष्ट आहे ज्याचा संवाद दोघांमध्ये होतो. लग्नाबद्दल काही असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल… सध्या आम्ही हनीमूनपूर्वीच्या गोष्टी अनुभवत आहोत..’ मलाकायने सांगितल्यानुसार अभिनेत्रीने अद्याप लग्नाचा विचार केलेला नाही.
मलायका अरोरा चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. मलायका वयाच्या ४९ व्या वर्षी देखील प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.
एवढंच नाही तर, अभिनेत्री प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. ती कायम वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना देखील फिट राहण्याचं आवाहन करत असते.