अजय देवगण याचा मोठा दावा, चाहते हैराण, माझ्यामुळेच आरआरआर चित्रपटाला ऑस्कर, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा – Ajay Devgn made a huge claim about RRR movie

मनोरंजन


बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अजय देवगण याचा भोला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करताना अजय देवगण हा दिसतोय. अजय देवगण याचे चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहेत.

मुंबई : एसएस राजामौली यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केलीये. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने थेट ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. नाटू नाटू या गाण्याने मोठा इतिहास रचलाय. नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) मिळाल्यानंतर संपूर्ण देशातून चित्रपटाच्या टिमवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. आरआरआर या चित्रपटात अभिनेता राम चरण आणि ज्यूनियर एनटीआर हे मुख्य भूमिकेत होते. या दोघांनी या चित्रपटात जबरदस्त असा अभिनय केलाय. या दोन्ही अभिनेत्यांचे या चित्रपटाचे (Movie) काैतुक केले गेले.

विशेष म्हणजे बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा देखील या चित्रपटात कॅमिओ आहे. गेल्या काही दिवसांपासून अजय देवगण हा त्याच्या आगामी भोला या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. भोला हा चित्रपट 30 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अजय देवगण हा दिसतोय.

नुकताच भोला चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अजय देवगण हा कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचला होता. यावेळी अजय देवगण हा कपिल शर्मा याच्यासोबत धमाल करताना दिसला. मात्र, कपिल शर्मा याच्या चित्रपटात अजय देवगण याने अत्यंत मोठा खुलासा केला आहे. अजय देवगण याचे हे बोलणे ऐकून सुरूवातीला चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.

अजय देवगण म्हणाला की, आरआरआर चित्रपटाला माझ्यामुळेच ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. कारण मी जर आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्यावर डान्स केला असता तर आरआरआर चित्रपटाला कधीच ऑस्कर पुरस्कार मिळू शकला नसता. यामुळे माझ्यामुळेच आरआरआर चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. अजय देवगण याचे हे बोलणे ऐकून सर्वचजण हसताना दिसले. अजय देवगण याचे हे बोलणे ऐकून अनेकांना धक्काही बसला.

आरआरआर चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यामुळे कपिल शर्मा हा अजय देवगण याचे अभिनंदन करताना दिसला. यावेळीच अजय देवगण याने हा मोठा खुलासा केला. गेल्या काही दिवसांपासून अजय देवगण याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहेत. अजय देवगण याच्या दृश्यम 2 चित्रपटाने तूफान अशी कामगिरी बाॅक्स आॅफिसवर काही दिवसांपूर्वीच केलीये. आता भोला चित्रपट काय धमाका करतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. ज्यावेळी बाॅलिवूडचे चित्रपट हे बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात होते, त्यावेळी अजय देवगण याच्या दृश्यम 2 या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *