Video | या दोन अभिनेत्यांमध्ये तूफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल, चित्रपटसृष्टीत खळबळ – Clash between these two actors, video viral on social media

मनोरंजन


चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ निर्माण झालीये. कारण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये चक्क दोन अभिनेत्यांची हाणामारी होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी मोठा धक्का बसलाय. आता या व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

मुंबई : अभिनेते आणि चित्रपट निर्माते मोहन बाबू (Mohan Babu) यांचे मनोज मंचू आणि विष्णू मंचू हे मुले गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. मनोज मंचू आणि विष्णू मंचू या दोघांमध्ये काहीतरी वाद झाल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल होती. हे दोघे एकमेकांना बोलत देखील नव्हते. आता यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाल्याने अनेकांना मोठा धक्का बसलाय. हा व्हिडीओ शेअर करताना अनेक गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. मात्र, हा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

मनोज मंचूचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले, या लग्नाला विष्णू मंचू उपस्थित देखील नव्हता. यामुळे सतत यांच्या वादाच्या चर्चा सुरू होता. वादाच्या चर्चांमध्येच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दोन्ही भाऊ भांडताना दिसत आहेत. दोन भांवडांमध्ये भांडण्याचे व्हिडीओ कायमच व्हायरल होतात. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये हाणामारी झाल्याचे देखील दिसत आहे.  मात्र, सेलेब्रिटीजच्या घरातील भांडणे पाहून चर्चांना उधाण आले आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दोन्ही भाऊ भांडताना दिसत असून मारहाणीपर्यंत यांचे भांडणे गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

रिपोर्टनुसार या भांडणानंतर मनोज मंचू याने भावाविरोधात पोलिसात तक्रार देण्याचे ठरवले आहे. मात्र, मनोज मंचू आणि विष्णू मंचू यांचा हा भांडतानाचा व्हिडीओ पाहून तेलुगु फिल्म इंडस्ट्रीमध्ये चर्चांना उधाण आले आहे. कारण मंचू परिवार तेलुगु फिल्म इंडस्ट्रीमध्ये अतिशय प्रतिष्ठित जमले जाते. दोन अभिनेत्यांना भांडताना पाहून चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय.

मनोज मंचू हा विष्णूच्या घरात घुसून त्याच्या कुटुंबियांवर आणि नातेवाईकांवर हल्ला करतानाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मनोज हा विष्णूला शिवीगाळ करत घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप व्हिडीओ शेअर करताना केला आहे. हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *