Rashmika Mandanna घरी काम करणाऱ्या मोलकरणीच्या देखील पडते पाया; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली… – Rashmika Mandanna touches her made feet for blessings

मनोरंजन


रश्मिका मंदाना का पडते तिच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीच्या पाया? अभिनेत्रीने सांगितलेलं कारण माहिती पडल्यानंतर तुम्हीही म्हणाल…

मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिच्या सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत. रुपरी पडद्यावर अभिनेत्री जेवढी ग्लॅमरस दिसते, रश्मिका खऱ्या आयुष्यात तितकीच मायाळू आणि इतरांचा आदर करणारी व्यक्ती आहे. रश्मिका आता झगमगत्या विश्वात वावरत असली तरी, अभिनेत्री हिंदू संस्कृती विसरलेली नाही. हिंदू धर्मामध्ये घरातील लहान सदस्य मोठ्यांचा आदर करत पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेततात. रश्मिका देखील जेव्हा घरी जाते, तेव्हा अभिनेत्री घराच्या मोठ्या सदस्यांचे आशीर्वाद घ्यायला विसरत नाही. महत्त्वाचं म्हणजे, अभिनेत्री फक्त घरातल्या सदस्यांचे आशीर्वाद घेत नाही तर, घरात काम करणाऱ्या व्यक्तींचे देखील आशीर्वाद घेते. याचं कारण खुद्द अभिनेत्रीने सांगितलं आहे.

एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या अभिनेत्री पाया का पडते यावर रश्मिका म्हणाली, ‘आयुष्यातील छोट्या – छोट्या गोष्टी मझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. माझ्या पाळीव प्राण्यासोबत मित्रांसोबत वेळ व्यतीत केल्यानंतर मला आनंद मिळतो…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी प्रत्येक गोष्ट डायरीमध्ये लिहून ठेवतो. घरी मी सर्वांच्या पाया पडते. ज्यामुळे मी त्यांना सन्मान देवू शकेल. मी माझ्या काम करणाऱ्या प्रत्येकाच्या पाया पडते. कारण मी कधीही कोणामध्येही फरक ठेवत नाही. मी प्रत्येकाचा सन्मान करते आणि मी अशीच आहे…’

हे सुद्धा वाचामुलाखतीत अभिनेत्रीला पुढचा प्रश्न विचारला की, तू जे काम करत आहेस, त्यावर कुटुंबाला गर्व वाटतो. या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या कुटुंबाला माहिती नाही की सध्या त्यांची मुलगी काय करते. कारण माझं कुटुंब सिनेविश्वापासून फार दूर आहे. जर मला कोणता पुरस्कार मिळाला, तर त्यांना आनंद होतो…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

रश्मिका सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढंंच नाही तर, रश्मिका अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत असते. पण दोघांनीही त्यांच्या नात्याचा स्वीकार केलेला केलं नाही.

रश्मिका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत ‘पुष्पा’ सिनेमानंतर मोठी वाढ झाली. ‘पुष्पा’ सिनेमात यश मिळवल्यानतंर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘गुडबाय’ सिनेमातून रश्मिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता आभिनेत्री ‘सीता रामम’ आणि ‘वारिसु’ या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *