Rahul Gandhi | नक्की काय आहे चार वर्षे जुने प्रकरण? ज्यात राहुल गांधींना झालीय दोन वर्षांची शिक्षा, जाणून घ्या एका क्लिकवर…

कृषी


Rahul Gandhi | मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना गुरुवारी सूरत सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन मिनिटांत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने शिक्षेला 30 दिवसांची स्थगिती दिली असली आणि लगेच जामीन मंजूर केला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकातील एका सभेत विधान केले होते की सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे? या वक्तव्याविरोधात सुरत कोर्टात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. निवडणूक रॅलीदरम्यान भाजपचे आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री पूर्णेश मोदी यांनी मोदींच्या आडनावाबाबत राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणातील सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 17 मार्च रोजी निकाल राखून ठेवला होता. जाणून घ्या काय होते हे संपूर्ण प्रकरण.

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

मी नेहमीच भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला
कोर्टात सुनावणीदरम्यान राहुल गांधी म्हणाले “मी एक राजकीय नेता आहे आणि या संदर्भात मी भ्रष्टाचार उघड करण्यासाठी हे वक्तव्य केले आहे. मी जे बोललो ते माझे कर्तव्य आहे. मी नेहमीच भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला आहे. माझा हेतू चुकीचा किंवा कोणाला दुखवण्याचा कधीच नव्हता. आम्हाला दया नको आहे.” यानंतर राहुल गांधींनी आपल्या वक्तव्यावर माफी मागण्यास नकार दिला.

राहुल गांधींनी फेटाळले आरोप
मागच्या सुनावणीत राहुल गांधी यांनी कोर्टात सांगितले होते की, मी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळतो. निवडणुकीच्या सभेत त्यांनी हे सांगितले, ते आठवत नाही. या प्रकरणी न्यायालयाने राहुल गांधींसोबत आणखी दोन साक्षीदार, कोलार, कर्नाटकचे तत्कालीन निवडणूक अधिकारी आणि भाषण रेकॉर्ड करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या व्हिडिओ रेकॉर्डरचे जबाब नोंदवले आहेत, त्यानंतर राहुल गांधी यांचीही चौकशी करण्यात आली.

वाचाबाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

न्यायालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात आला करण्यात
या खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी राहुल गांधी चौथ्यांदा न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी न्यायालयाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याच्या सुरक्षेसाठी सुमारे 150 जवान तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

राहुल गांधी यांच वक्तव्य
राहुल गांधी 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकमधील एका निवडणूक सभेत म्हणाले की नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सामान्य का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का? यानंतर भाजप आमदाराने मानहानीचा खटला दाखल करत आरोप केला की, 2019 च्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल यांनी सर्व चोरांना मोदी हे आडनाव का आहे, असे म्हणत संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केली होती. त्यांच्या वक्तव्याने आमच्या आणि समाजाच्या भावना दुखावल्या. भूपेंद्र पटेल सरकारच्या पहिल्या कार्यकाळात पूर्णेश मंत्री होते. डिसेंबरमध्ये ते सुरतमधून पुन्हा आमदार झाले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: What exactly is a four year old case? In which Rahul Gandhi has been sentenced to two years, know in one click

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *