Nawazuddin Siddiqui मुलांसाठी तडजोड करण्यास तयार; पहिल्या पत्नीसमोर ठेवली ‘ही’ अट – Nawazuddin Sidiqqui ready to settle legal issues with wife aaliya for kids

मनोरंजन


मुलांसाठी Nawazuddin Siddiqui ‘ही’ अट मान्य करणा आलिया सिद्दीकी; पत्नीसोबत कायदेशीर मुद्द्यांवर तडजोड करण्यास नवाज तयार, पण…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Sidiqqui) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी आलिया सिद्दीकी (nawazuddin siddiqui wife) हिने केलेल्या गंभीर आरोपांनंतर अभिनेता दिवसागणिक अधिक वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. आलिया सिद्दीकी हिने अभिनेत्यावर घरातून बाहेर काढणं, बलात्कार यांसारखे गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे नवाजच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. नवाज पत्नीसोबत कायदेशीर मुद्द्यांवर तडजोड करण्यास तयार झाला आहे. पण त्याने आलियासमोर एक अट ठेवली आहे. त्यामुळे आता आलिया नवाजची अट मान्य करते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी मुंबई उच्च न्यायालयाला म्हटला आहे की, जर आलिया दोन्ही मुलं यानी आणि शेरा यांना मला भेटण्याची परवानगी देत असेल, तर अभिनेता दाखल केलेली याचिका मागे घेण्यास तयार आहे. सध्या आलिया सिद्दिकी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यातील वाद सर्वत्र तुफान चर्चेत आहेत.

न्यायालयात अभिनेत्याचे वकील प्रदीप थोरात म्हणाले, नवाजची दोन्ही मुलं दुबईमध्ये शाळेत जात नाहीत. नवाज याला मुले कु्ठे आहेत माहिती नाही. मुलांसाठी याचिका दाखल केली असं देखील अभिनेत्याचे वकील म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता म्हणाला, ‘या याचिकेमध्ये मुलांना भेटता येणाऱ्या अटींबाबत मला माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी मुलांना पाहिलेलं नाही. मला दोघांची काळजी वाटते. आलियाने दोन्ही मुलांना भेटण्याची परवानगी दिल्यास मी याचिका मागे घेईन.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

हे सुद्धा वाचायावर आलियाच्या वकिलांना देखील स्पष्टीकरण दिलं आहे. आलियाचे वकील शिखर खंडेलवाल म्हणाले, ‘त्याने दाखल केलेल्या याचिकेला अर्थ नाही. कारण याचिका दाखल करण्यात आली तेव्हा आलिया, नवाजच्या आईंसोबत राहत होती. असं असताना मुलं कुठे आहेत त्याला माहित नासणं हे अशक्य आहे, मुलांना भेटण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही… असं देखील आलियाचे वकील म्हणाले आहेत.

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने देखील त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी तिने मुंबई पोलिसांकडे पतीविरोधात तक्रार नोंदवली होती. आलियाने पतीवर बलात्काराचे देखील आरोप लावले आहेत. शिवाय आलियाच्या वकिलांनी देखील नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *