17 मार्च रोजी एमसी स्टॅन इंदौरमध्ये कॉन्सर्ट करणार होता. मात्र हा कॉन्सर्ट सुरू होण्याच्या काही तास आधीच रद्द करण्यात आला. करणी सेनेच्या सदस्यांनी कॉन्सर्टच्या ठिकाणी जाऊन जोरदार हंगामा केला होता आणि स्टॅनला धमकी दिली होती.

एमसी स्टॅन
मुंबई : बिग बॉस 16 चा विजेता आणि रॅपर एमसी स्टॅन गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. एकीकडे स्टॅन विविध शहरांमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट करतोय. तर दुसरीकडे बिग बॉसमधील माजी स्पर्धक आणि त्याचा मित्र अब्दु रोझिक विविध आरोप करत आहे. यादरम्यान आता स्टॅनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एमसी स्टॅन गर्दीत कोणाला तरी मारण्यासाठी धावतो, मात्र त्याला मध्येच थांबवलं जातं. त्याचं हे वागणं पाहून चाहतेसुद्धा थक्क झाले आहेत.