Mahesh Bhatt यांच्या मुलीला कोरोनाची लागण; अभिनेत्री ट्विट करत म्हणाली… – Mahesh Bhatt daughter pooja bhatt infected with corona

मनोरंजन


देशात वाढतोय कोरोना व्हायरसचा हाहाकार? महेश भट्ट यांच्या लेकीला देखील कोविडची लागण; ट्विट करत अभिनेत्रीने केलं असं आवाहन

मुंबई : देशात कोरोना व्हायरसचा हाहाकार वाढताना दिसत आहे. नुकताच दिग्गज अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी सोशल मीडियावर कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आणि स्वतःची काळजी घेण्याचं देखील आवाहन केलं. मार्च २०२० मध्ये भारतात दाखल झालेल्या कोरोना व्हायरसने देशात हाहाकार माजवला होता. पण आता पुन्हा कोरोना व्हायरसने डोक वर काढल्याचं चित्र दिसत आहे. ज्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी घेण्याची प्रचंड आवश्कता आहे. किरण खेर यांच्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट (pooja bhatt) हिला कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेत्रीने ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

पूजा भट्ट ट्विट करत म्हणाली, ‘तीन वर्षांनंतर पहिल्यांदा माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तुम्ही सर्वांना मास्क घाला… कोविड पुन्हा जवळ येत आहे. पूर्ण लसीकरण झालं असेल तरी, कोरोना व्हायरसची लागण होत आहे. लवकरच बरी होवून घरी जाईल अशी अपेक्षा करते…’ असं अभिनेत्री ट्विट करत म्हणली आहे. (pooja bhatt infected with corona )

हे सुद्धा वाचापूजा भट्ट महेश भट्ट यांची मोठी मुलगी आहे. पूजाने १९८९ साली प्रदर्शित झालेल्या ‘डॅडी’ सिनेमाच्या माध्यामातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हा पूजा फक्त १७ वर्षांची होती. आता पूजा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियाची मदत घेते. सोशल मीडियावर पूजाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

‘डॅडी’ सिनेमाच्या माध्यामातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यानंतर पूजाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. पण कालांतराने तिची लोकप्रियता कमी होवू लागली.  पूजा भट्ट स्टारर ‘दिल है कि मानता नहीं’ सिनेमाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. सिनेमात पूजासोबत अभिनेता आमिर खान याने महत्त्वाची भूमिका साकारली.

‘दिल है कि मानता नहीं’ सिनेमानंतर पूजा भट्ट अनेक सिनेमांमध्ये दिसली. शिवाय तिने ‘कजरारे’, ‘जिस्म 2’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन देखील केलं आहे. पूजा ‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ सिनेमात दिसली होती. यामध्ये पूजासोबत सनी देओल, दुलकर सलमान आणि श्रेया धन्वंतरी यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली. पूजाने ‘बॉम्बे बेगम’ आणि ‘सडक 2’ मध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *