Agricultural Machines | शेतकऱ्यांची चिंता मिटली! कमी खर्चात मिळणारं भरघोस उत्पन्न, एकदा शेतकऱ्याचा जुगाड पहाच…

कृषी


Agricultural Machines | कासारखेडा (जि. वर्धा) येथील शेतकरी योगेश लिचडे यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी काही भन्नाट यंत्रांची ( Agricultural Machines) निर्मिती केली आहे. तण नियंत्रण आणि आंतर मशागतीसाठी ही यंत्रे ( Agricultural Machines) अतिशय उपयुक्त ठरत आहेत. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे.

शेतकऱ्यांन केलं जबरदस्त जुगाड
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मागील अनेक कटकटींपैकी एक म्हणजे मजूर वेळेवर उपलब्ध न होणं आणि दुसरी म्हणजे मशागतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरचं भाडं न परवडणं. मात्र या कटकटींवर उपाय शोधला आहे कासाररखेडा (जि.वर्धा) येथील एका शेतकऱ्यानं. या शेतकऱ्याचं नाव आहे योगेश लिचडे. मिनी ट्रॅक्टर पॉवर विडर आणि पॉवर ट्रेलर यासारखी वापरायला सहज व सोपी अशा यंत्रांची योगेश यांनी निर्मिती केली आहे. शेतातील मशागत आणि तण नियंत्रणासाठी ही यंत्रे फायदेशीर ठरत आहेत.

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

शेतकऱ्यांना होणार जबरदस्त फायदा
मजूर वेळेवर न मिळणं आणि पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे नांगरणी, रोटर इत्यादी कामांसाठी ट्रॅक्टर मालकांनी वाढवलेलं भाडं यामुळे अल्पभूधारक शेतकरी कात्रीत सापडला आहे. मात्र योगेश यांनी निर्माण केलेल्या यंत्रांच्या वापराने यातून अल्पभूधारक शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. तण नियंत्रणासाठी आणि मशागतीसाठी ही यंत्रे फायदेशीर ठरत आहेत. ही यंत्रे आकाराने लहान, वापरायला सहज व सोपी आणि कमी खर्चिक आहेत.
बैल जोडीने चार एकर शेतीची मशागत करण्यासाठी साधारण दोन दिवस लागतात. तसेच ट्रॅक्टरचा वापर केल्यास हा खर्च चार हजार रुपयांपर्यंत जातो. मात्र योगेश यांनी तयार केलेल्या मिनी ट्रॅक्टरच्या वापराने या खर्चात तब्बल 3000 रुपये इतकी बचत होते. म्हणजे चार एकरांसाठी एक हजार रुपये इतकाच खर्च येतो.
अशा रीतीने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होते. यामुळे सहाजिकच नफा वाढतो.

वाचाबाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

शेतकऱ्याला कशी सुचली कल्पना?
योगेश यांची तीन एकर शेती आहे. यामध्ये मोठ्या यंत्रांचा सतत वापर करणे शक्य नव्हते. तसेच वेळेवर मजूर न मिळाल्याने योगेश काळजीत होते. या काळजीतूनच योगेश यांना ही भन्नाट कल्पना सुचली. या यंत्रांची निर्मिती करताना वेल्डिंग प्रशिक्षण पूर्ण केल्याचा त्यांना फायदा झाला. सुरुवातीला त्यांनी पायी चालत वापरला जाणारा, आकाराने लहान छोटा पॉवर विडर तयार केला. मात्र इथेच न थांबता त्यांनी यात आणखी सुधारणा केली. या यंत्रांचा वापर त्यांनी आपल्या शेतात केला. त्यांच्या खर्चात बचत झाली. सहाजिकच नफा वाढला. इतकंच नाही तर त्यांनी मिनी ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर यांचीही स्वतःच निर्मिती केली आहे. यासाठी त्यांनी स्क्रॅपमधील विविध मटेरियल्सचा वापर केलेला आहे. या कामात त्यांना घरच्यांचीही खूप मोठी साथ मिळाली.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers worries solved! Huge income at low cost, just watch the farmer’s game

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *