सूर्या शिवकुमार आणि त्याची पत्नी ज्योतिका हे दोन्ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय नावं आहेत. दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात जेव्हा दोघांनी एकत्र हजेरी लावली, तेव्हा सर्वांच्या नजरा या जोडीवर खिळल्या होत्या.

Suriya and Jyotika
Image Credit source: Instagram
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुर्या आणि त्याची पत्नी ज्योतिका यांना गेल्या काही दिवसांत अनेकदा मुंबईत पाहिलं गेलंय. देव आणि दिया या दोन मुलांसोबत ते मुंबईत दिसले. साऊथ सुपरस्टार्सना सातत्याने मुंबईत पाहिल्यानंतर त्यांनी इथे घर घेतल्याची चर्चा सुरू झाली. सुर्या आणि ज्योतिकाने मुंबई तब्बल 70 कोटी रुपयांचं घर विकत घेतल्याच्या चर्चांना उधाणं आलं. मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या करिअरसाठी त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या चर्चांमागील सत्य आता समोर आलं आहे.