काही दिवसांपूर्वीही रणवीर-दीपिकाच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती. चित्रपट समिक्षक उमैर संधू यांनी रणवीर-दीपिकाच्या नात्याबद्दल ट्विट केलं होतं. ‘ब्रेकिंग, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्यात काही आलबेल नाही’, असं ट्विट त्यांनी केलं.

Ranveer Singh and Deepika Padukone
Image Credit source: Instagram
मुंबई : गुरुवारी मुंबईत ‘इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स’चा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली. बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही नामांकित सेलिब्रिटी हे कार्यक्रमाला पुरस्कार प्रस्तुत करण्यासाठी आले होते. त्यात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंगसोबत दीपिका पदुकोणच्या जोडीने सर्वांचं लक्ष वेधलं. दीपिका आणि रणवीर एकत्र ब्लॅक आऊटफिटमध्ये रेड कार्पेटवर आले, मात्र यावेळी असं काही घडलं जे पाहून नेटकऱ्यांमध्ये दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली.