महाराष्ट्र भूषण! ‘लता मंगेशकर यांच्यासारख्याच आशा भोसले या देखील शतकात एकच’, राज्याच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित – asha bhosle honored as maharashtra bhushan by cm eknath shinde and dcm devendra fadnavis

मनोरंजन


आपल्या सुमधुर स्वरांनी गेली अनेक दशके रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

मुंबई : ‘दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासारख्याच आशा भोसले (Asha Bhosale) या देखील शतकात एकच आहेत’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांच्याप्रती सद्भावना व्यक्त केल्या. आपल्या सुमधुर स्वरांनी गेली अनेक दशके रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गेटवे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्यासह कला आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. यावेळी फडणवीसांना आशा भोसले यांच्या कर्तृत्वाबद्दल गौरवोद्गार काढत सन्मानित केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *