परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या नात्याचं सत्य अखेर समोर; खरंच एकमेकांना करत आहेत डेट? – Parineeti Chopra And Raghav Chadha Are Dating what is truth

मनोरंजन


परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या नात्याबद्दल मोठी अपडेट समोर; खरंच अभिनेत्री करतेय या खासदाराला डेट?… एका गोष्टीमुळे दोघांच्या नात्याचं सत्य समोर…

मुंबई : बॉलिवूडमध्ये कायम सेलिब्रिटींच्या नात्याची चर्चा रंगलेली असते. आता अभिनेत्री परिणीती (parineeti chopra) चोप्रा हिच्या खासगी आयुष्याबद्द अनेक चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिणीती खासदार राघव चड्ढा यांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे फोटो समोर आल्यानंतर दोघांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. पण रंगणाऱ्या चर्चांवर अद्याप राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी कोणत्याही प्रकारची भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे दोघे खरंच डेट करत आहेत का? असा प्रश्न चाहत्यांच्या आणि अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा एकमेकांना डेट करत नसून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांनी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतल्याची माहिती समोर आहेत. म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा एकमेकांना ओळखत आहेत. परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा सलग दोन दिवस एकत्र दिसल्यमुळे रंगणाऱ्या चर्चांनी जोर धरला होता.

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्यांची ओळख महाविद्यालयापासून आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर देखील राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी त्यांच्या नात्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण दोघे फक्त चांगले मीत्र असल्याची माहिती समोर येत आहे.

राघव चड्ढा हे आम आदमी पक्षाचे पंजाबचे खासदार आहेत. मुंबईतील एका रेस्टोरेंटबाहेर परिणीतीसोबत स्पॉट झाल्यानंतर राघव चड्ढा चर्चेत आले आहेत. पण दोघांमध्ये मैत्रीचं नातं असल्याची माहिती समोर येत आहे.

परिणीती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शिवाय परिणीती अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची बहीण देखील आहे. परिणीताने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. सध्या परिणीती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

परिणीती सोशल मीडियावर देखील फार सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

परिणीता हिने अनेक सिनेमांमध्ये भूमिका बजावत चाहत्यांच्या मनात घर केलं. परिणीताने २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लेडीज vs रिक्की’ सिनेमातून करियरला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. चाहते कायम परिणीताच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *