टॉमने एका मुलाखतीत हे मान्य केलं होतं की घटस्फोटानंतर तो सुरीच्या आयुष्यापासूनही दूर निघून गेला. मी मुलीला भेटणं तर दूर, पण तिला पाहूसुद्धा शकलो नाही, असंही त्याने म्हटलं होतं.

Tom Cruise daughter Suri
Image Credit source: Instagram
फ्लॉरिडा : गेल्या वर्षी हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझच्या ‘टॉप गन : मॅवरिक’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्याच्या आगामी ‘मिशन इम्पॉसिबल 7’ या चित्रपटाचीही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. टॉमचं प्रोफेशनल आयुष्य इतकं यशस्वी असताना त्याच्या खासगी आयुष्यातील समस्या मात्र आजही कायम आहेत. टॉम त्याची मुलगी सुरीला गेल्या दहा वर्षांपासून भेटू शकला नाही. केटी होम्सशी घटस्फोट झाल्यानंतर टॉम क्रूझ आणि त्याच्या मुलीमध्ये हा दुरावा आला.