गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. पठाण चित्रपटानंतर शाहरुख खान याने त्याच्या आगामी डंकी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आणि आता तो जवान चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या करिअरमधील पठाण हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट (Movie) ठरलाय. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला आणि शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची वाट पाहात होते.
शेवटी शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाने पहिल्यांदाच दिवशी तूफान अशी कामगिरी करत जगभरातून 100 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. या चित्रपटाने बाहुबली या चित्रपटाचा रेकाॅर्ड देखील तोडला. सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा चित्रपट ठरलाय.
पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. अनेकांनी थेट या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही करू टाकली. देशामध्ये अनेक ठिकाणी चित्रपटाच्या विरोधात आंदोलने करण्यात आलीये. मात्र, जेंव्हा प्रत्यक्षात हा चित्रपट रिलीज झाला तेंव्हा पठाण चित्रपटाची हवा बाॅक्स आॅफिसवर होती.
Khansaab @iamsrk please add one more cutest fan in your list… pic.twitter.com/peCMLOorbJ
— Irfan Pathan (@IrfanPathan) March 22, 2023
विशेष म्हणजे पठाण चित्रपटाचे काही खास प्रमोशन करताना शाहरुख खान हा दिसला नाही. पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांसाठी सेशनचे आयोजन करत होता. या सेशनमध्ये शाहरुख खान हा चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देत होता.
फक्त पठाण हा चित्रपटच नव्हेतर चित्रपटाची सर्वच गाणे हीट ठरली. पठाण चित्रपटाची गाण्यावर अनेक लहान मुले ही डान्स करताना दिसली आहेत. नुकताच क्रिकेटर इरफान पठान याने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे इरफान पठान याने हा व्हिडीओ शाहरुख खान याला टॅग केला आहे. शाहरुख खान यानेही इरफान पठाणच्या व्हिडीओवर कमेंट केलीये.
इरफान पठाण याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचा मुलगा हा दिसत आहे. विशेष म्हणजे इरफान पठाण याचा मुलगा पठाण चित्रपटातील झूमे रे पठान या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत शाहरुख खान म्हणाला की, हा तुझ्यापेक्षाही टॅलेंटेड आहे. छोटा पठान…आता इरफान पठाण याने शेअर केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.