2003 मध्ये सोनू निगमला ‘कल हो ना हो’ या चित्रपटाच्या शीर्षक गीतासाठी राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी त्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. अग्निपथ चित्रपटातील ‘अभी मुझ मैं कही’ हे त्याचं गाणं आजही चाहत्यांना भावतं.

Sonu Nigam and his father
Image Credit source: Facebook
मुंबई : प्रसिद्ध गायक सोनू निगमचे वडील आगमकुमार निगम यांच्या घरी चोरीची घटना घडली. याप्रकरणी त्यांच्या माजी ड्राइव्हरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सोनू निगमच्या वडिलांच्या घरातून 72 लाख रुपयांची चोरी झाली होती. 76 वर्षीय आगमकुमार हे मुंबईतल्या अंधेरी इथल्या विंडसर ग्रँड इमारतीत राहतात. 19 आणि 20 मार्च रोजी ही चोरीची घटना घडली. बुधवारी सोनू निगमची बहीण निकिताने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आगमकुमार यांच्याकडे रेहान नावाच्या ड्राइव्हरने जवळपास आठ महिने काम केलं होतं. मात्र त्याचं काम समाधानकारक नसल्याने नुकतंच त्याला नोकरीवरून काढण्यात आलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.