Sensex and Nifty | अमेरिकेतील ट्रिगरने भारतीय शेअर बाजाराचा बिघडवला खेळ, दोन दिवसांच्या तेजीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले

कृषी


Sensex and Nifty | काल, बुधवारी जेव्हा यूएस फेडरल रिझर्व्हने फेड रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सने वाढ केली, तेव्हा आज शेअर बाजाराची स्थिती आणखी बिकट होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. आज शेअर (Sensex and Nifty) बाजारात कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 289 अंकांनी घसरून 57,925 वर, तर निफ्टी (Sensex and Nifty ) देखील 80 अंकांनी घसरून 17,953 वर पोहोचला. भारतीय शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांपासून तेजी पाहायला मिळत होती.

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

या काळात गुंतवणूकदारांनी भरपूर पैसा कमावला होता, पण फेडच्या दर कपातीनंतर एकाच दिवसात त्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम उद्या बाजारावरही दिसून येईल. यामुळे रिझर्व्ह बँकेवर रेपो रेट वाढवण्याचा दबावही निर्माण होईल, ज्यामुळे आगामी काळात शेअर (Sensex and Nifty) बाजारात घसरण होईल, असे जाणकार सांगत आहेत. गेल्या 1 महिन्यात भारतीय शेअर बाजार 3,000 हून अधिक अंकांनी घसरला आहे. भविष्यातही परिस्थिती केवळ तोट्याचीच दिसते.

बुधवारी बाजार तेजीत बंद झाले
तत्पूर्वी बुधवारी बाजार तेजीसह बंद झाले. बीएसईचा ३० समभागांचा सेन्सेक्स १३९.९१ अंकांनी म्हणजेच ०.२४ टक्क्यांनी वाढून ५८,२१४.५९ वर बंद झाला. व्यापारादरम्यान एका टप्प्यावर तो 344.1 अंकांवर गेला होता. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 18 समभाग नफ्यात गेले. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा 50 शेअर्स असलेला निफ्टीही 44.40 अंकांनी म्हणजेच 0.26 टक्क्यांच्या वाढीसह 17,151.90 वर बंद झाला.

वाचाबाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

यूएस फेडरल रिझर्व्हने काल केली ‘ही’ घोषणा
यूएस फेडरल रिझर्व्हने बुधवारी फेड रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. या घोषणेनंतर, व्याजदर आता 4.75% वरून 5% पर्यंत वाढेल. अमेरिकेतील दोन बँकांच्या अलीकडेच दिवाळखोरी होऊनही, फेड दरात वाढ होईल, जेणेकरून महागाई नियंत्रित करता येईल, असा कयास तज्ञ व्यक्त करत होते. गेल्या एका वर्षात, यूएस फेडरल रिझर्व्ह जवळजवळ प्रत्येक महिन्याला व्याजदर वाढवत आहे. याचा परिणाम अमेरिकेतील रोखे उत्पन्नावर होतो. त्याचा थेट तोटा तिथल्या बँकांना होत आहे, जे आपला बहुतांश व्यवसाय फक्त बाँडमध्ये करतात. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही होणार आहे. आता गुरुवारी शेअर बाजार किती खाली जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *