कपिल शर्मा याचा ज्विगाटो हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. ज्विगाटो या चित्रपटामध्ये कपिल शर्मा हा डिलीवरी बाॅयच्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे काॅमेडियन कपिल शर्मा याचा हा तिसरा बाॅलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्येक क्रेझ बघायला मिळाली.
मुंबई : काॅमेडीचा किंग अर्थात कपिल शर्मा (Kapil Sharma) याचा ज्विगाटो हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झालाय. मात्र, या चित्रपटाला अजूनही बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. राणी मुखर्जी हिचा मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे आणि कपिल शर्मा याचा ज्विगाटो हे चित्रपट (Movie) एकाच दिवशी रिलीज झाले. मात्र, दोन्ही चित्रपटाला काही खास धमाका करता आला नाही. दुसरीकडे राणी मुखर्जी हिच्या चित्रपटाला तरी प्रेक्षकांचे थोडेफार प्रेम मिळताना दिसत आहे. मात्र, कपिल शर्मा याच्या ज्विगाटोचे (Zwigato) हाल होताना बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळत आहेत. या चित्रपटाची रिलीजच्या अगोदर प्रेक्षकांमध्ये क्रेझ बघायला मिळाली.
ज्विगाटो या चित्रपटात कपिल शर्मा हा डिलीवरी बाॅयच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची संपूर्ण स्टोरी ही एका डिलीवरी बाॅयच्या भोवती फिरताना दिसते. विशेष म्हणजे कपिल शर्मा हा या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला होता. यावेळी कपिल शर्मा याने त्याच्या आयुष्यामधील मोठे खुलासे देखील केले आहेत.
एका मुलाखतीमध्ये कपिल शर्मा याने सांगितले की, तो डिप्रेशनमध्ये असताना त्याच्यासोबत नेमके काय घडते होते आणि तो काळ त्याच्यासाठी किती जास्त कठीण होता. डिप्रेशनच्या काळात चक्क दारू पिऊन कपिल शर्मा हा अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी गेला. इतकेच नाहीतर यादरम्यान त्याला शाहरूख खान याने देखील समजावून सांगितले होते.
कपिल शर्मा याच्या ज्विगाटो या चित्रपटाबद्दल अत्यंत मोठी बातमी पुढे येतंय. एका राज्यात कपिल शर्मा याचा ज्विगाटो हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. ओडिशा सरकारने मोठा निर्णय घेत कपिल शर्मा याला मोठे गिफ्ट दिले आहे. याबद्दलची माहिती सीएमओ ओडिशाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही शेअर करण्यात आली आहे. यामुळे आता कपिल शर्मा याच्या चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय.
कपिल शर्मा याच्या या चित्रपटाची शूटिंग ही भुवनेश्वर येथे करण्यात आलीये. द कपिल शर्मा या शोमध्ये बाॅलिवूडचे अनेक मोठे कलाकार हे चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कायमच येतात. मात्र, कपिल शर्मा हा त्याच्या ज्विगाटो या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी काही शोमध्ये सहभागी झाला होता. विशेष म्हणजे ज्विगाटो हा कपिल शर्मा याच्या करिअरमधील तिसरा बाॅलिवूड चित्रपट आहे. कपिल शर्मा याचा चित्रपट प्रमोट करताना त्याची मानलेली बहीण भारती सिंह ही दिसली होती.